जिल्ह्यात शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात

By Admin | Updated: September 8, 2014 00:46 IST2014-09-08T00:46:56+5:302014-09-08T00:46:56+5:30

महर्षी विद्या मंदिर शाळा बेला येथे शिक्षक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य श्रृती ओहळे या उपस्थित होत्या.

Excitement of teacher day events in the district | जिल्ह्यात शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात

जिल्ह्यात शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात

भंडारा : महर्षी विद्या मंदिर शाळा बेला येथे शिक्षक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य श्रृती ओहळे या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व्यक्तिमत्त्वाचे अनुकरण करून आदर्श कार्य करावे, असे मौलिक मार्गदर्शन प्राचार्य ओहळे यांनी केले. यानंतर दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दाखविण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
मोहाडी : समाजात परिवर्तन करण्यासाठी व संस्कारशील राष्ट्रनिर्मिती शिक्षकच करू शकतात असे प्रतिपादन महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवीचे मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी केले. विद्यार्थ्यांचे स्वयंशासन उपक्रम घेण्यात आले. उपक्रमाचे आयोजन हेमराज राऊत यांनी केले होते. यावेळी पंतप्रधान याचे भाषण व संवाद सायसीटीच्या प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात आले. संचालन व आभार प्रदर्शन गजानन वैद्य यांनी केले.
कारधा : कारधा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषेत वर्गात शिकवले. तसेच बालविकास मंचाच्या विद्यार्थी सदस्यांकरिता शिक्षक दिनानिमित्त शिक्षणाची जननी आध्यशिक्षिका सावित्रीबाई फुले या विषयावर चित्रकला स्पर्धा राबविली. यावेळी ग्राम कारधा येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मलोडे, शिक्षकवृंद युवराज शामकुवर, रोशन बोरकर, बुद्धम मेश्राम, सुकेशना बोरकर, आकांक्षा बोरकर, रामटेके, नवसीन खान, अंजली मुलींडे, सेलोकर, भोयर, बेबी मडामे उपस्थित होते.
भंडारा : चैतन्य कनिष्ठ महाविद्यालय आणि चैतन्य कॉन्व्हेंट बांपेवाडा येथे विद्यार्थ्यांचे स्वयंशासन घेण्यात आले. यावेळी प्राचार्य देवानंद मळामे, के.एस. चांदेवार, टी.डी. वंजारी, मंगेश मळामे, सोनकुसरे, कॉन्व्हेंट शिक्षिका नंदा सोनवाने, नूतन जांभुळकर, उके उपस्थित होते. संचालन के.एस. चांदेवार तर आभार लिलाधर हेमणे यांनी मानले.
साकोली : वडेगाव (खांबा) येथील तिरुपती विद्यालय तथा स्व.निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महाविद्यालय येथे कार्यक्रमाला मुख्याध्यापक ए.एच. रहांगडाले, रवींद्र रहांगडाले, प्रभू कापगते, रमेश बोंबार्डे, आर.डब्ल्यू. कापगते, प्रा.अनिल गहाणे, प्रा.ज्ञानेश्वरी पटले, एम.ई. रामटेके उपस्थित होते.
साकोली : जि.प. प्राथमिक शाळा चारगाव येथे कार्यक्रमाप्रसंगी शा.व्य. समिती अध्यक्ष विजय लंजे ललीता नेवारे, सदस्या किशोर मदनकर, मुख्याध्यापक आर.एम. हटवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. कामथे यांनी संचालन तर रोटकर यांनी आभार प्रदर्शन केले.
भंडारा : ईरा प्ले स्कूल भंडारा येथे मुलांना डॉ.राधाकृष्ण यांचे जीवनचरित्र सांगण्यात आले. यावेळी संचालक महेश भगत उपस्थित होते. मुलांनी शिक्षकांसाठी फुल आणून आभार व्यक्त केले.
भंडारा : युनायटेड कॉन्व्हेंट इंग्लीश स्कूल पेट्रोलपंप (ठाणा) येथे आयोजित कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी चामट उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन त्यांना बक्षिसे दिली. संचालन कमलेश येळणे आणि आभार प्रदर्शन पूनम भोवते यांनी मानले. विद्यार्थ्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दूरदर्शनच्या माध्यमातून दाखविण्यात आले.
भंडारा : स्थानिक नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय तसेच पा.वा. नवीन मुलींची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष वसंतराव गुर्जर, कार्यवाह अ‍ॅड.एम.एल. भुरे, रेखा पनके, इंदिरा गायकवाड, प्राचार्या अमिता तिवारी, उपमुख्याध्यापिका शिला भुरे, पर्यवेक्षक दाढी, पा.वा. नवीन मुलींच्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका अकिनवार, अरुणोदय बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका धास्कट उपस्थित होते. वसंतराव गुर्जर यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापिकांना सत्कार निधी देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संचालन मृदुला उमाळकर, स्नेहा निखाडे तर आभार पूनम बंधाटे या विद्यार्थिनीने केले.
भंडारा : माणिकराव सुखदेवे माध्यमिक विद्यालय अशोकनगर (फुलमोगरा) येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासनाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील एकूण ३४ विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षिका म्हणून सहभाग नोंदविला. मुख्याध्यापिका म्हणून गौरी बोरकर तर उपमुख्याध्यापिका म्हणून प्रणाली मेश्राम हिने कार्यभार सांभाळला. लिपीक म्हणून अभिषेक मडामे याने काम पाहिले. हायस्कुल विभागातून प्रथम क्रमांक रुपाली मेश्राम, द्वितीय अंजली वासनिक व गौरी बोरकर, तृतीय प्रणाली मेश्राम हिचा आला. आयोजन सांस्कृतिक प्रमुख श्रावण चव्हाण यांनी केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील घोल्लर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ेकले. कार्यक्रमाला अनंत डुंभरे, काशिनाथ वाडीभस्मे, गजानन लिचडे, सुरेंद्र लिचडे आदी उपस्थित होते.
भंडारा: राष्ट्रीय विद्यालय भंडारा येथे भंडारा सेंट्रलच्या वतीेने राष्ट्रीय विद्यालय भंडाराचे मुख्याध्यापक रत्नदिप मेश्राम, पर्यवेक्षक अनिल कापटे, शिक्षिका मीना दलाल यांचे शाल व श्रीफळ देवून तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला लॉयन्सचे कुमार नशीने, अनिल तिघरे, डॉ.एल.डी. गिऱ्हेपुंजे, अरुण निर्वाण, मोहन नायर, दिनेश गर्ग, आय.ए. खान, शैलेश तिवारी, अविनाश पनके, कल्पना पनके, डॉ.जयंता गिऱ्हेपुंजे उपस्थित होते. संचालन जुबेर कुरैशी व आभार चव्हाण यांनी मानले. प्रधानमंत्री यांचे भाषण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. कार्यक्रमासाठी भूषण फसाटे, राहुल बावनकुळे, वर्षा धोटे, कविता बावनकुळे, अल्का साकुरे, रेखा गिऱ्हेपुंजे, नंदेश्वर, ज्योती मुळे, संदीप मस्के, गंगाधर मुळे, पराग शेंडे, श्रीराम शहारे, शेखर थोटे यांनी सहकार्य केले.
पेंढरी : सेवानिवृत्त शिक्षक तु.डो. नागलवाडे तिरुपती विद्यालय तथा निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महाविद्यालय रेंगोळा मांगली येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक तु.डी. नागलवाडे होते. अतिथी म्हणून प्राचार्य विलास वाघाये, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवीदास पंचबुद्धे, ग्रा.पं. सदस्य गोसू मेश्राम, सुभाष वनवे, भिका मोहतुरे उपस्थित होते. संचालन जी.पी. धनगर, प्रास्ताविक प्राचार्य विलास वाघाये यांनी तर आभार डी.डी. फटे यांनी केले.
भंडारा: नेहरु युवा केंद्र भंडारा व गौरव बहुउद्देशिय संस्था खैरी बेटाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा खैरी बे. येथे जि.प. प्राथमिक शाळा येथे कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुधराम ईश्वरकर, शाळेचे मुख्याध्यापिका वंजारी, सहाय्यक शिक्षिका येलमुले, सतीश ईश्वरकर, नेहरु युवा कोर, राहुल बांते, रक्षा सुखदेवे व रिना मोहनकर हे उपस्थित होते.
भंडारा: मन्साराम पडोळे कला महाविद्यालय गणेशपूर येथे रासेयोच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.आय. कहालकर होते. यावेळी प्रा.डॉ. रक्षीत बागडे, प्रा.पी.डी. डोंगरवार यांनी मार्गदर्शन केले. प्रा.भुरे, प्रा.एस.डी. बेलेकर, प्रा.एस.एस. राऊत, प्रा.एम.एस. लिमजे, प्रा.एम.डी. राघोर्ते, महेश कुथे, एच.के. तुपटे, बोंदरे, कावळे, चव्हण व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रा.बोरकर यांनी तर आभार सूर्यवंशी यांनी केले. (लोकमत न्युज नेटवर्क)

Web Title: Excitement of teacher day events in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.