जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटविल्याचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:48 IST2019-08-05T22:47:30+5:302019-08-05T22:48:00+5:30
जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा हटविल्याचे वृत्त भंडारा शहरात येताच येथील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. फाटाक्यांची आतषबाजी करुन अभिनंदन सभा घेण्यात आली.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटविल्याचा जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा हटविल्याचे वृत्त भंडारा शहरात येताच येथील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. फाटाक्यांची आतषबाजी करुन अभिनंदन सभा घेण्यात आली.
जम्मू काश्मिरवर ऐतिहासीक निर्णय घेत जम्मू, काश्मिर व लद्दाक ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. तसेच कलम ३७० व ३५(अ) रद्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या या निर्णयाचे वृत्त शहरात येताच जल्लोष करण्यात आला. येथील गांधी चौकात अभिनंदन सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे होते. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र भोंडेकर, रिपाई (आठवले) चे जिल्हाध्यक्ष आसीत बागडे, विहिपचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. संजय एकापुरे, बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे, रजनी सोनकुसरे उपस्थित होते. संचालन नगर सेवक संजय कुंभलकर यांनी तर आभार नगर परिषद उपाध्यक्ष आशु गोंडाणे यांनी मानले.
सभेला आबीद सिद्दीकी, चैतन्य उमाळकर, मुकेश थानथराटे, हेमंत देशमुख, प्रशांत खोब्रागडे, चंद्रशेखर रोकडे, मंगेश वंजारी, मयुर बिसेन, विकास मदनकर, नितीन धकाते, मधुरा मदनकर, शमीमा शेख, आशा उके, साधना त्रिवेदी, वनिता कुथे, चंद्रकला भोपे, भूपेश तलमले, निखिल तिरपुडे, रोशन काटेखाये, अमित बिसने, रुबी चढ्ढा, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, राजु व्यास आदी उपस्थित होते