साकोली तालुक्यात रेतीचे उत्खनन
By Admin | Updated: April 30, 2015 00:39 IST2015-04-30T00:39:58+5:302015-04-30T00:39:58+5:30
तालुक्यातील ज्या रेतीघाटाचा लिलाव झाला नाही अशा अशा ठिकाणाहून रेतीचे उत्खनन सुरू आहे.

साकोली तालुक्यात रेतीचे उत्खनन
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : पोलीस चौकीची केली मागणी
साकोली : तालुक्यातील ज्या रेतीघाटाचा लिलाव झाला नाही अशा अशा ठिकाणाहून रेतीचे उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन तात्काळ थांबविण्यात यावे व या रेतीघाटावर पोलीस चौकीची व्यवस्था करावी, अशी मागणी नर्मदा ट्रेडर्स लाखनी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नर्मदा ट्रेडर्सने भुगाव व मौजा वटेटेकर येथील रेतीचे घाट लिलावात घेतले आहे. मात्र रेतीघाटावरून दररोज २५ ते ३० ट्रॅक्टर रेती अवैध उत्खननाद्वारे वाहतूक केली जाते. ही वाहतूक सानगडी, लाखनी व गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथे होत आहे. यापुर्वीसुद्धा या प्रकरणाची तक्रार केली. या रेती उत्खननामुळे नर्मदा ट्रेडर्सच्या रेतीघाटावर रेती नेण्यासाठी एकही ट्रॅक्टर येत नाही. त्यामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देवून रेतीचे उत्खनन करणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोली तालुक्यात रेतीचे उत्खनन रोखण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांचे एक पथक तयार असून अवैध उत्खननावर नजर ठेवून आहेत. या महिन्यात २८ ट्रॅक्टरवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. सासरा, महालगाव व निलज या रेतीघाटावर पोलीस चौकी लावण्यात येईल.
- डॉ. हंसा मोहणे,
तहसीलदार, साकोली.