प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:25+5:302021-04-02T04:37:25+5:30

येथील नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जात असून, याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ...

Everyone should take care of themselves | प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी

प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी

येथील नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जात असून, याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. मंडल यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सेवक हाके यांचे पथक विद्यार्थ्यांचे नमुने घेत आहे. विद्यार्थीसंख्या जास्त असून चाचणीच्या किट्स कमी उपलब्ध होत असल्यामुळे दररोज फक्त ५० विद्यार्थ्यांची चाचणी करणे सुरू आहे. जास्त किट्स उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या कोरोनाची तीव्रता वाढत आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. मंडल यांनी केले आहे.

या वेळी प्राचार्य नरेंद्र काडगाये, पर्यवेक्षक हिवराज साखरे, प्रा. मुरलीधर मानकर, प्रा. दिनेश नाकाडे, प्रा. विक्रांत मोहबंशी, प्रा. चैतराम कापगते, जे. पी. मेश्राम, एम. ए. पाऊलझगडे, श्रीनिवास कॉलेजवार, आस्तिक वाघमारे आणि दिलीप हलमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Everyone should take care of themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.