प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्यावे
By Admin | Updated: June 28, 2017 00:37 IST2017-06-28T00:37:10+5:302017-06-28T00:37:10+5:30
पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी आता धोक्याचा इशारा दिला आहे.

प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्यावे
अनिल सोले : कोसरा ग्रा.पं.मध्ये वृक्ष दिंडीचे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींनी आता धोक्याचा इशारा दिला आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढासळत आहे. प्रदूषण समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वृक्ष कटाईने शेतीला व मानवाला मोठा फटका बसत आहे. शासनाने चार कोटी वृक्षारोपणाचा संकल्प केला असून प्रत्येकांनी एक झाड दत्तक घेऊन जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन कोसरा ग्रामपंचायत येते वृक्ष दिंडी कार्यक्रमात आमदार प्रा.अनिल सोले बोलत होते.
ग्रीन अर्थव आॅर्गनायझेशन व महाराष्ट्र वन विभाग आणि सामाजिक वनीकरण संचालनालय द्वारा आयोजित वृक्ष दिंडी रथा यात्रेचे स्वागत ग्रामपंचायत कार्यालय कोसरा येथे करण्यात आले. या वृक्ष दिंडी कार्यक्रमात आमदार प्रा.अनिल सोले, पवनी तालुका अध्यक्ष भाजपा के.डी. मोटघरे, महिला आघाडी भाजपा हंसा खोब्रागडे, सरपंच शेवंता जुगनायके उपसरपंच निता रामटेके, शिवा फंदी, राजू फुलबांधे, विलास वैद्ये, प्रशांत खोब्रागडे, प्रकाश कुर्झेकर, जयकुमार पारधी, भगवान लाखे, सुरेश राऊत, रेणुका रत्नपारखी, नेहा खोब्रागडे, ललीता उपरीकर, सारिका गंथाळे, संध्या मोटघरे, रामकृष्ण जांभुळकर, विनोद पडोळे, बंडू जांभुळकर, नेपाल देशमुख, वसंता गंथाळे, संजय रत्नपारखी, विनोद बिलवणे, गांधी तलमले व गावातील प्रतिष्ठीत उपस्थित होते.
आमदार अनिल सोले पुढे म्हणाले जगाची लोकसंख्या साडे सातशे कोटी व भारताची लोकसंख्या सव्वाशे कोटी आहेण २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या साडे नऊ कोटीवर जाणार आहे. भारताची लोकसंख्या १५० कोटीवर जाणार आहे. एवढ्या लोकांची प्राणवायूची जबाबदारी पर्यावरणावर आहे. म्हणजेच झाडावर आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून या वृक्ष दिंडीचा गावगावात स्वागत करून प्रत्येकांनी वृक्षारोपणाचा संकल्प केला तर जंगले नष्ट होणार नाही व पर्यावरणाचा संतुलन बिघडणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाला कोसरा ग्रामवासी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून वृक्षदिंडीचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी धम्मा लोणारे, राजू वाघमारे, ग्रामविकास अधिकारी विजय मुळे, मनिषा गभणे व ग्रामपंचायत सदस्य व भाजपा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.