प्रत्येकाने बौद्ध धम्माचे नाते जोपासावे
By Admin | Updated: October 25, 2015 00:32 IST2015-10-25T00:32:13+5:302015-10-25T00:32:13+5:30
अशोक विजयादशमी याच मंगलदिनी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. धम्माच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने वागावे, ...

प्रत्येकाने बौद्ध धम्माचे नाते जोपासावे
धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
भंडारा : अशोक विजयादशमी याच मंगलदिनी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. धम्माच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने वागावे, त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे आचरण करावे, आज समाज विषारी मद्यांच्या (टॉक्सीक)च्या आहारी जात आहे. त्यामुळे व्यक्ती आणि समाज दुर्बळ होत आहे. ते प्रत्येकाने जोपासावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भंडारातर्फे त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे धम्मक्रांती दिनानिमित्त गुरुवारला ५९ वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक दिलीप झळके उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने करण्यात आली. प्रास्ताविक समिती सचिव हर्षल मेश्राम यांनी केले. त्यांनी धम्मदिक्षेमुळेच आमच्या जगण्याला अर्थप्राप्त झाला. २२ प्रतिज्ञा शहाणा माणूस सभ्य समाज घडविणाऱ्या संहिता आहेत. तसेच संस्थेचे आर्थिकतेचा आढावा देत असतांनी निधीअभावी पुतळ्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रा.सच्चिदानंद फुलेकर यांनी दुभंगलेला समाज बौद्ध धर्मानेच सांधता येईल म्हणून सर्वांनी धम्मशिकवण आचरणात आणावी, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव हुमणे यांनी सर्वांना सहकार्याचे आवाहन केले.
पंचशिल महिला मंडळातर्फे सुरेखा रामटेके, मंदा मेश्राम, सुनिता बन्सोड, सुजाता घोडीचोर यांनी अल्पोपहार दिला. आभारप्रदर्शन टी.के. नंदागवळी यांनी केले. संचालन प्रा.रमेश जांगळे यांनी केले. कायक्रमाकरिता वसंत हुमणे, श्यामल भादुडी, वामन मेश्राम, वानखेडे, प्रा.रमेश जांगळे, पुर्णाताई सतदेवे, सूर्यकांत हुमणे, युवराज रामटेके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समितीचे असित बागडे, बी.सी. गजभिये, कैलाश टेंभुर्णे, एम.यु. मेश्राम यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)