शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

हर हर महादेवचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:35 IST

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हरहर महादेवच्या गजरात हजारो भाविकांनी ठिकठिकाणच्या शिवालयात दर्शन घेतले. भंडाराचे ग्रामदैवत श्री बहिरंगेश्वर मंदिर, गायमुख, नागझिरा, कोरंभी, झिरी, डोंगरमहादेव, आंभोरा, लाखा पाटील, गिरोला पहाडी, उकारा देवस्थान, भिलेवाडा टेकडी आदी ठिकाणी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देशिवालयात भाविकांच्या रांगा : ठिकठिकाणी धार्मिक अधिष्ठान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हरहर महादेवच्या गजरात हजारो भाविकांनी ठिकठिकाणच्या शिवालयात दर्शन घेतले. भंडाराचे ग्रामदैवत श्री बहिरंगेश्वर मंदिर, गायमुख, नागझिरा, कोरंभी, झिरी, डोंगरमहादेव, आंभोरा, लाखा पाटील, गिरोला पहाडी, उकारा देवस्थान, भिलेवाडा टेकडी आदी ठिकाणी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.भंडारा शहरातील खांबतलाव परिसरातील बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोन दिवसांपासून येथे विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांनी पूजा अर्चा करून महादेवाची आराधना केली. मंदिराच्या चारही बाजूला भाविकांची प्रचंड गर्दी होती. तसेच परिसरात लागलेल्या यात्रेचाही आनंद भाविक घेत होते.तुमसर येथील हसारा रोडवरील राधाकृष्ण शिवमंदिरात महाशिवरात्री पर्व मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यासाठी प्रवचनकार सुश्री महेश्वरी देवी यांच्या संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष जगदीशचंद्र कारेमोरे यांच्या उपस्थितीत शिवजलाभिषेक करण्यात आला. आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लाखनी शहरासह तालुक्यात महाशिवरात्री पर्व उत्साहात साजरे करण्यात आले. पवनी तालुक्यातील कोरंभी येथील डोंगरमहादेव येथे भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. या ठिकाणी आठ दिवसांची यात्रा भरते. विदर्भातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पापासून तीन कि.मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात कोरंभी देवस्थान आहे. भगवान शंकराची प्रतिमा पहाडावरील एका गुफेत आहे. या गुफेत एकावेळी एक किंवा दोनच व्यक्ती जाऊ शकतात. डोंगर महादेव नावाने प्रसिद्ध या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी केली होती. पहाडावरील ७०० ते ८०० चढून गेल्यावर महादेवाच्या दर्शनाचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावरुन दिसत होता.भंडारा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आंभोरा या तिर्थस्थळी हजारो भाविकांनी शिवशंभूचे दर्शन घेतले. नागपूर, भंडारासह विदर्भातील भाविक गण या ठिकाणी येत असतात. पर्यटनस्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या या स्थळाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. लाखा पाटील व झिरी (नांदोरा) येथेही हजारो शिवभक्तांनी भोलेनाथांचे दर्शन घेऊन जत्रेचा आनंद लुटला. विशेष म्हणजे या ठिकाणी भक्तांसाठी विविध सुविधांची योग्यरित्या आखणी करण्यात आली होती.गायमुख व प्रतापगडावर भाविकांची गर्दीतुमसर तालुक्यातील गायमुख देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच प्रतापगड (महादेव पहाडी) येथेही भक्तांची मोठी गर्दी झाली होती. गायमुख नगर येथे मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी दर्शन घेतले. तर गायमुख देवस्थानात खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, राजेंद्र जैन आदींनी महादेवाचे दर्शन घेतले. दोन्ही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.