देशसेवेसाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे!
By Admin | Updated: March 22, 2017 00:35 IST2017-03-22T00:35:33+5:302017-03-22T00:35:33+5:30
देशाची सुरक्षा व अखंडता अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. सर्वांनी त्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन आयुध निर्माणी भंडाराचे वरिष्ठ महाप्रबंधक ई.आर. शेख यांनी व्यक्त केले.

देशसेवेसाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे!
ई. आर. शेख यांचे प्रतिपादन : आयुध निर्माणी दिवसानिमित्त कार्यक्रम
भंडारा : देशाची सुरक्षा व अखंडता अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. सर्वांनी त्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन आयुध निर्माणी भंडाराचे वरिष्ठ महाप्रबंधक ई.आर. शेख यांनी व्यक्त केले.
जवाहरनगर येथील आयुध निर्माणीचा स्थापना दिवस शनिवारला पार पडला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाला वरिष्ठ महाप्रबंधक ई.आर. शेख यांच्यासह प्रशासकीय कार्यप्रबंधक प्रभास भोई यांच्यासह आयुध निर्माणीचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
१८ मार्च १८०१ मध्ये भंडारा आयुध निर्माणीची निर्मिती झाली. या निर्मितीला २१६ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ आयुध निर्माणी दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळी ६.३० वाजता ईस्टेट दवाखाना येथून मुख्य प्रशासकीय भवन पर्यंत ई.आर. शेख यांच्या नेतृत्वात पायी रॅली काढण्यात आली. यानंतर शेख यांच्या हस्ते आयुध निर्माणी संघटनेचा ध्वजारोहण पार पडला. यावेळी प्रभास भोई यांनी रक्षामंत्री तथा आयुध निर्माणी बोर्डाचे महानिर्देशक यांचे संदेश वाचन केले.यावेळी शहीद कर्मचारी व अधिकाऱ्यांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान येथील कर्मचाऱ्याच्या परिवारासाठी निर्माण केलेल्या उत्सव लॉनचे लोकार्पण केले. सायंकाळी ४ वाजता निर्माणीत उत्पादीत साहित्यांची प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी एम.पी. हॉल येथे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमादरम्यान देशसेवेसाठी आपले योगदान देणाऱ्या ए. के. दुबे, एस.शेलार, झेड.ए. खान, व्ही.एस. पिल्लई यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी खुशतराश शेख, आईया उमाशंकर, डॉ.पी.एन. महाजन, सी.एच. बाबू आंबेडकर, अरुण कावळे, अमृत राज, मोयरमा यांच्यासह आयुध निर्माणीचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)