सदाबहार गीताने केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य
By Admin | Updated: July 1, 2014 23:21 IST2014-07-01T23:21:06+5:302014-07-01T23:21:06+5:30
लोकमत युवा नेक्स्ट बाल विकास मंच, सखी मंच व युवा शक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व भंडारा पॅरामेडीकल कॉलेज यांच्या सौजन्याने येथील इंद्रराज सभागृहात भंडारा आयडल गुणवंत

सदाबहार गीताने केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य
चंद्रमाला गांधी, आमीर व अदिनी ठरले भंडारा आयडल : गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व तज्ञाकडून मार्गदर्शन
भंडारा : लोकमत युवा नेक्स्ट बाल विकास मंच, सखी मंच व युवा शक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व भंडारा पॅरामेडीकल कॉलेज यांच्या सौजन्याने येथील इंद्रराज सभागृहात भंडारा आयडल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात चंद्रकाला गांधी, आमीर शेख, अदिाी निचकवडे विविध गटातून भंडारा आयडल ठरले. कार्यक्रमात जिल्हाभरातून स्पर्धकांनी हजेरी लावली होती. सर्व विजयी स्पर्धक व गुणवंताचा मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
युवा शक्ती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शशीकांत भोयर, भंडारा पॅरामेडीकल कॉलेजचे संचालक अनिल कुर्वे, प्रा.महाकांळ, प्राध्यापिका चुटे, प्रा.मुंगूसमारे यांच्या हस्ते माता सरस्वती व लोकमतचे संस्थापकीय संपादक जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
उपस्थित विद्यार्थ्याकरीता १० वी १२ वी नंतर पुढे काय, मार्गदर्शन करण्यात आले. प्राध्यापक सुनिल महाकाळ यांनी अभियांत्रिकी क्षेत्रावर, प्राध्यापक मुंगूसमारे यांनी वैद्यकीय क्षेत्र व प्राध्यापिका चुटे यांनी पॅरामेडीकल शाखेवर मार्गदर्शन केले. अंतर्गत येणाऱ्या विविध शाखा, उपलब्ध महाविद्यालय व विद्यापीठ तसेच प्रवेश प्रक्रिये बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारांतर्गत एकूण ६० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यापैकी उत्कृष्ट क्षितीजा राजाभोज, साक्षी गभने, जान्हवी कारेमोरे, सायली चेटूले, श्वेता आंबेडारे, काजल चोपकर, अभिषेक ठवकर, एकता मानकर, प्राजक्ता कुकडे, आशय चिरर्वतकर अतुल बारापात्रे प्रणय हलमारे, पोमेश्वरी पटले, शर्वरी गिऱ्हेपुंजे, सुजित बांते, श्रेया गजभिये, खुशी क्षीरसागर, पुनम शहारे, शाजीयामूम अंसारी, किर्ती फटे यांचा मानचिन्ह व पदक देऊन सत्कार करण्यात आला. विशेष सत्काराकरिता नवोदीत मराठी अभिनेत्री चैताली अभिनय क्षेत्र, दिक्षा वैद्य हिला साहित्य व काव्य संग्रह करीता कलाक्षेत्रातून व कमलेश मेश्रामला उत्कृष्ट युवा कार्यकर्ता म्हणून सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. आदर्श शिक्षक म्हणून खराशी येथील डमदेव कहालकर यांना गौरविण्यात आले.
भंडारा आयडल कार्यक्रमात युवा नेक्स्ट,बाल विकास मंच व सखी मंच या तिनही गटातून शंभरा हुनही अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. बाल विकास मंच गटामधून प्रथम अदिती निचकवडे, द्वितीय कृतिका सुर व आर्या नंदनवार यांना निवडण्यात आले.
सखी मंच गटातून चंद्रमाला गांधी प्रथम व युवा नेक्स्ट गटातून, आमीर शेख प्रथम, निलेश सुर्यवंशी, द्वितीय व सपना गोस्वामी हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
भंडारा आयडलच्या विशेष सादरीकरण पुरस्काराकरीता लियाखत खान व विलास डोंगरे यांना पुरस्कृत करण्यात आले.
परीक्षक म्हणून लाभलेले राहुल हुमणे व वनश्री गजभिये यांनाही पुष्पगुच्छ व मानचिन्ह देवून सम्मानित करण्यात आले. यावेळी चाहुल नागपुरे याने माऊथ आॅरगनवर ये दोन्ही या गिताचे सादरीकरण करून् सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन शरयु टाकळकर व कोमल सेलोकर, आभार शशीकांत भोयर यांनी मानले. कार्यक्रमाची प्रस्तावना युवा नेक्स्ट जिल्हा संयोजका ग्रीष्मा खोत यांनी व आयोजन जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे यांनी केले.
सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार, सुधाकर गोन्नाडे, राजेश पराते, कामेश पटले, योगेश पटले, कमलेश मेश्राम, अमीत रंगारी, लोकेश टेमदास, स्पर्शा रामटेके, सोनाली शेंडे, स्रेहा वरकडे, स्रेहल लुटे, लतीशा खोत, सुचिता गजभिये यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)