अखेर रस्त्याच्या कडा भरल्या मुरूमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:31+5:302021-07-15T04:24:31+5:30

भंडारा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत तयार करण्यात असलेल्या गणेशपूर , पिंडकेपार, कोरंभी या गावांना जोडणारा रस्ता तयार करण्यात ...

Eventually the roadside was filled with pimples | अखेर रस्त्याच्या कडा भरल्या मुरूमाने

अखेर रस्त्याच्या कडा भरल्या मुरूमाने

भंडारा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत तयार करण्यात असलेल्या गणेशपूर , पिंडकेपार, कोरंभी या गावांना जोडणारा रस्ता तयार करण्यात आला. मात्र दोन ते तीन महिने लोटून सुद्धा गेले व रोडपासून जमिनीचे अंतर खूपच मोठे असल्याने कोणत्याही वाहनाने जाणे म्हणजेच अपघाताला तोंड सतत द्यावे लागत होते. सदर शेतकरी व नागरिक तसेच व्यापारी वर्गाने जनसेवक पवन मस्के यांच्याकडे तक्रार करताच सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागातील अधिकारी, अभियंता यांनी दखल घेऊन रस्त्यावर मुरूम घालून व साईडला पिचिंग दगड करत तीन दिवसात कामाला वेग आला आहे. पिंडकेपार, गणेशपूर, कोरंभी देवी व अन्य गावातील नागरिकांना रहदारी सोयीयुक्त होणार आहे. यावेळी पवन मस्के‌, योगेश बोरकर, अशोक खोब्रागडे, गौरव मस्के, श्याम उके, गजू मेहर, प्रमोद साठवणे, दिलीप साठवणे, दिलीप रुद्रकार, रामा शेंडे, बाळा मारबते, माणिक आंबीलढुके, योगेश बोरकर, सुरेश सूर्यवंशी, प्रवीण मेहर आदी उपस्थित होते.

Web Title: Eventually the roadside was filled with pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.