अखेर त्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:37 IST2021-07-27T04:37:15+5:302021-07-27T04:37:15+5:30
लाखांदूर : कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करणाऱ्या तालुक्यातील राजनी येथील शेतकऱ्याचा अखेर नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याने १८ जुलै ...

अखेर त्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
लाखांदूर : कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करणाऱ्या तालुक्यातील राजनी येथील शेतकऱ्याचा अखेर नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याने १८ जुलै रोजी विष प्राशन केले होते. तब्बल नऊ दिवस मृत्यू झुंज देत रविवारी त्याची प्राणज्योत मालवली.
मधुकर महादेव ठाकरे (५७) रा. राजनी असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर बँक, पतसंस्था व खासगी असे जवळपास सहा लाखांचे कर्ज आहे. या कर्जाला कंटाळून १८ जुलै रोजी घरी त्याने विषप्राशन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्याला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी व एक मुलगा आहे.
260721\img-20210726-wa0020.jpg
मृतक मधुकर महादेव ठाकरे