अखेर कालव्याच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:37 IST2017-08-03T23:34:44+5:302017-08-03T23:37:41+5:30

अड्याळमध्ये सध्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठिण तर आहेच परंतु येथील शेकडो शेतकºयांच्या शेतात पाणी नसल्याने शेत पडित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Eventually the canal started | अखेर कालव्याच्या कामाला सुरूवात

अखेर कालव्याच्या कामाला सुरूवात

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी गेले कुठे : शेतकºयांनी वर्गणी गोळा करून दिले पंधरा हजार

लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळमध्ये सध्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठिण तर आहेच परंतु येथील शेकडो शेतकºयांच्या शेतात पाणी नसल्याने शेत पडित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत ज्या शेतकºयामुळे काम अडले होते त्याला नगदी १५ हजार शेतकºयांनी लोकवर्गणी काढून दिले त्यामुळे विभागाला मोठी मदत झाली आणि कामाला सुरवातही झाली.
शेतात पाणी आणायचे म्हणून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई व मंडई पेठ अड्याळ येथील शेकडो शेतकºयांनी तीन दिवसाआधी कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होेते.
महत्वाचे म्हणजे सालेवाडा गावाजवळील मोठ्या कालव्याचेकाम गेली तीन वर्षापासून अपुर्णावस्थेत त्यामुळे हजारो शेतकरी दरवर्षी पाणी शेताला उपलब्ध करू शकत नव्हते आणि यासाठी गावातील लोकप्रतिनिधींनी तथा फोटो काढून मिरवणूक, गवगवा करणारे कार्यकर्तेही यासाठी असफल झाल्याचे दिसताच मंडई पेठेतील शेतकºयांनीच किशोर पंचभाई यांच्या सोबत शेतीला पाणी मिळावे म्हणून रास्ता रोको आंदोलनही करणार होते.
परंतु कुठे गेले शेतकºयांचे कैवारी लोकप्रतिनिधी असाही सुरू मात्र काम सुरू असलेल्या ठिकाणी उपस्थित शेतकºयांच्या मुखातून ऐकू येत होता.
अड्याळ गावाला सध्या लोकवर्गणीचे ग्रहन लागल्याचे बोलले जात आहे. मग तो सार्वजनिक बसस्थानकाचा असो वा या कालव्याचा. किशोर पंचभाई यांनी बरीच मदत केल्याचे बोलले जाते तसेच माजी आ. नरेंद्र भोंडेकर यांचीही मदत लाभल्याचे बोलले जाते. या कालव्यामुळे अड्याळचे शेतकरी आनंदात राहतील मग बाकी शेतकºयांनी काय करायचे? असा प्रश्न आहे.

Web Title: Eventually the canal started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.