चार महिने लोटूनही विमा कंपनीकडून मदत नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST2021-01-20T04:34:49+5:302021-01-20T04:34:49+5:30
विमा कंपन्यांविरोधात शेतकरी आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामधून पैसे कापून विमा कंपन्या पिकांना सुरक्षा कवच देतात; परंतु ...

चार महिने लोटूनही विमा कंपनीकडून मदत नाहीच
विमा कंपन्यांविरोधात शेतकरी आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामधून पैसे कापून विमा कंपन्या पिकांना सुरक्षा कवच देतात; परंतु नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना मात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. खरीप हंगामात अनेकांनी कृषी कर्ज घेतानाच पीक विमाही काढला होता. बँकेच्या माध्यमातून विमा कंपन्यांना पीक विम्याची राशी दिली जाते. नैसर्गिक आपत्तीत हा एक प्रकारचा बळिराजासाठी सुरक्षा कवच आहे; परंतु नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावरही विमा कंपन्या हात वर करतात. यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे आरोप होत आहेत. पूर, परतीचा पाऊस, मावा, तुडतुडा रोगाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही सर्वेक्षणाकरिता विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतशिवारात वेळीच धाव घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पुरेशी मदत मिळालेली नाही.