शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ई-केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांना गारपिटीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 18:19 IST

पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा : शासन लक्ष देईल काय?

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : २ मे २०२३ ला पालांदूर परिसरात जोरदार वादळ व गारपीट झाली. यात अनेक घरांसह शेत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तहसीलदार लाखनी व महसूल प्रशासनातील स्थानिक अधिकारी थेट नुकसानग्रस्तांच्या भेटी घेऊन पंचनामे उरकले होते. लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांच्या सोबतीला होते. शासनाच्या वतीने नुकसानभरपाई मंजूर केली गेली. परंतु ती नुकसानभरपाई वर्ष लोटूनही ई-केवायसी आटोपूनसुद्धा लाभार्थीना मिळाली नाही.

नुकसानभरपाईपोटी शासनाकडून अनुदान मिळण्याकरिता डीबीटी अंतर्गत ऑनलाइन व्यवस्था सुरू असल्याचे प्रशासनाकडून कळले आहे. डीबीटीकरिता शेतकऱ्यांना ई- केवायसी अर्थात आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. तहसीलदार लाखनी यांनी केवायसीसाठी पात्र लाभार्थीसोबत पत्रव्यवहार केला. पालांदूर परिसरातील अंदाजे २०० शेतकऱ्यांची ई-केवायसीसंबंधी अडचणी निर्माण झाल्या. त्यातील अर्ध्यावर शेतकऱ्यांनी केवायसी शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण केले, तर काहींचे खाते सुरळीत होते तर काहींची नुकसान होऊनसुद्धा यादीत त्यांचे नावच नाही. अशा तीन-चार कारणाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकाचे पैसे वर्षभरापासून मिळालेलेच नाहीत.

घरांच्या नुकसानीचे मिळाले पैसेपालांदूर, महेगाव, वाकलसह इतरही लगतच्या गावातील नुकसानग्रस्त घरमालकांना डीबीटी अंतर्गत पैसे मिळाले. मात्र शेताच्या नुकसानीचे अजूनही अनुदान मिळाले नसल्याने शेतकरीवर्ग चिंतित आहे.

कर्जमुक्ती योजनेसारखे तर होणार नाही ना?छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती व महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचे असेच भिजत घोंगडे आजही सुरूच आहे. कित्येक पात्र लाभार्थीना अजूनही कर्जमुक्त्तीचा लाभ मिळालेला नाही. आपले सरकार सेवा केंद्रात महापोर्टलवर नोंदणी करून पात्र असल्याचे शासनाला कळवले आहे. गारपिटीचे तर होणार नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.

तहसील कार्यालयाकडून नुकसानभरपाई संबंधात ई- केवायसी करण्याच्या संबंधाने पत्रव्यवहार केला असेल, अशा व्यक्तींनी लवकरात लवकर ई- केवायसी करावी, काही समस्या असल्यास तलाठी कार्यालय, पालांदूर किंवा तहसील कार्यालय लाखनी येथे संपर्क साधावा.- सुनील कासराळे, तलाठी, पालांदूर 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीbhandara-acभंडाराCrop Insuranceपीक विमा