८४८ ज्योती कलशांची स्थापना
By Admin | Updated: March 23, 2015 00:44 IST2015-03-23T00:44:52+5:302015-03-23T00:44:52+5:30
येथील प्रसिध्द दक्षिणमुखी हनुमंत मंदिरात गुढीपाडवाच्या पर्वावर ८४८ अंखड मनोकामना पूर्ती ज्योती कलशांची स्थापना करण्यात आली आहे.

८४८ ज्योती कलशांची स्थापना
अड्याळ : येथील प्रसिध्द दक्षिणमुखी हनुमंत मंदिरात गुढीपाडवाच्या पर्वावर ८४८ अंखड मनोकामना पूर्ती ज्योती कलशांची स्थापना करण्यात आली आहे. पावन पवित्र पर्वाला एक तपाचा कालावधी पूर्ण झाला आहे अशी माहिती आचार्य वीरेंद्र महाराज (कोरबा) यांनी दिली.
यावर्षीही गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या कालावधीत चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वावर मनोकामना पुर्ती अखंड ज्योती कलश महोत्सवात ८४८ ज्योती प्रज्वलीत करण्यात आली आहे. या महोत्सवाचे आयोजन हनुमंत मंदिरात करण्यात आले आहे. यावेळी भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसली.
व्यवस्थापनासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू रोहणकर व त्याची टिम व भक्त गण या पावन पवित्र महोत्सवात कामाला हातभार लावतात. श्रध्देचा उगम विश्वासात आहे आणि विश्वासाच बीज आशेमध्ये दडलेला असते. असे मत विरेंद्र महाराज यावेळी बोलले. अड्याळ व परिसरातील भक्त गणांनी, जनतेने या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमेटीतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)