जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ नंतर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST2021-04-22T04:37:00+5:302021-04-22T04:37:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ...

Essentials shops close after 11 a.m. | जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ नंतर बंद

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ नंतर बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश मंगळवारी निर्गमित केले. बुधवारी भंडारा शहरासह जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजता बंद झाली. त्यामुळे दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट होता. केवळ औषधाची दुकाने सुरु होती.

भंडारा शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी घोषित केली आहे. त्यानुसार कुणालाही विनाकारण रस्त्यावर फिरण्यास बंदी आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सायंकाळपर्यंत उघडी राहात असल्याने अनेकजण विविध कारणे सांगून रस्त्यावर फिरत होते.

मंगळवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आदेश निर्गमित केला असून, जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याचे निर्देश दिले. पहिल्या दिवशी बुधवारी शहरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ११ वाजता बंद करण्यात आली. शहर पोलिसांनी गस्त घालून दुकानदारांना सूचना दिली. सर्व दुकाने बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. मात्र, काहीजण बिनकामाचे फिरतानाही दिसत होते.

Web Title: Essentials shops close after 11 a.m.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.