विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संरक्षण संदेश
By Admin | Updated: October 1, 2014 23:18 IST2014-10-01T23:18:21+5:302014-10-01T23:18:21+5:30
नवरात्रीनिमित्त ग्रीन हेरिटेज पर्यावरण व पर्यटन संस्था, लॉयन्स क्लब राईस सिटी (तुमसर), माँ वैष्णोराणी दांडिया गरबा ग्रुप (तुमसर)च्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण, निसर्ग, पर्यटन विषयावर ६० फुटच्या

विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संरक्षण संदेश
भंडारा : नवरात्रीनिमित्त ग्रीन हेरिटेज पर्यावरण व पर्यटन संस्था, लॉयन्स क्लब राईस सिटी (तुमसर), माँ वैष्णोराणी दांडिया गरबा ग्रुप (तुमसर)च्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण, निसर्ग, पर्यटन विषयावर ६० फुटच्या कॅनव्हॉसवर विविध शळा व महा.च्या विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्र काढून पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रणाचा संदेश दिला.
तुमसर येथील विनोबा भावे नगर स्थितश्यामसुंदर जयस्वाल सभागृहात आयोजित पर्यावरण महाचित्र स्पर्धेत श्रीमती गोपिकाबाई भुरे महिला महा. तुमसर, जनता शाळा तुमसर, साई महिला कॉलेज, माँ वैष्णोराणी दांडिया गरबा ग्रुप तुमसर, सनफ्लॅग स्कुलचे मुले व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आकर्षक व रंगीत महाचित्र साकारले. ग्रीन हेरिटेजचे संस्थापक अध्यक्ष मो. सईद शेख, राईस सिटी लायन्स क्लब तुमसरचे अध्यक्ष पुरुषोत्तम सोनकर, मीरा भट्ट, ग्रीन हेरिटेजच्या चंदा मुरकुटे, शरद लिमजे, जयंत धनवलकर, डॉ. यशवंत गायधनी आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शंकर जयस्वाल, अल्का जायस्वाल, मुबारक कुरैशी, माँ वैष्णोराणी दांडिया गरबा ग्रुप तुमसरचे अतुल डोंगरवार, प्रितम लांजेवार, वैभव डेकाटे, राहुल बर्वे, विदर्भ जनसंदेशचे इंजि. हर्षल मलेवार, आनंद पारधी, प्रवीण मेश्राम, अंकीता राणा, कविता सेलोकर उपस्थित होते.
बांगळकर प्राथमिक शाळा, तुमसरच्या पटांगणावर माँ वैष्णोराणी दांडिया गरबा ग्रुप तुमसरद्वारा आयोजित दांडिया उत्सव कार्यक्रमात महाचित्र स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान पटकाविणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. मॉयलचे प्रबंधक आर.वी. सिंग, मॉयल प्रबंधक तर्फे प्रथम पुरस्कार श्रीमती गोपिकाबाई भुरे महिला महा. तुमसरला पुरुषोत्तम सोनकर तर्फे द्वितीय पुरस्कार जनता महाविद्यालय, तुमसर यांना मीरा भट्ट तर्फे तृतीय पारितोषिक माँ वैष्णोराणी दांडिया गरबा ग्रुप तुमसर यांना देण्यात आले. ग्रीन हेरिटेजतर्फे सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, पी.एस. डोंगरे, जिल्हा सहा. आरोग्य अधिकारी डॉ. शांतिदास लुंगे, ग्रीन हेरिटेजचे सईद शेख, मीरा भट्ट, डॉ.चवळे, डी.एन. चौधरी उपस्थित होते. डॉ. शांतिदास लुंगे यांनी या आयोजनाप्रती प्रसंशोद्गार काढले. सईद शेख यांनी नवरात्रीच्या पावन पर्वावर सर्वांनी पर्यावरण संरक्षणाकरिता पुढाकार घेऊन शांती व सलोखा राखण्याचे आवाहन केले. संचालन शिव माधवानी तर आभार प्रदर्शन मीरा भट्ट यांनी केले. याप्रसंगी महाचित्र स्पर्धेतील विद्यार्थी व पाहुण्यांनी पर्यावरण महाचित्र प्रदर्शित करून पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रणाचा संदेश दिला. चंदा मुरकुटे यांनी या प्रसंगी आकर्षक रांगोळी काढली. कार्यक्रमासाठी प्रविण लांजेवार, अतुल डोंगरवार, वैभव डेकाटे, राहुल बर्वे, इंजि. हर्षल मलेवार, आनंद पारधी, प्रविण मेश्राम, अंकीता राणा, शुभम यादव, शिव माधवानी, कविता सेलोकर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)