कोका अभयारण्यात पर्यावरण दिन

By Admin | Updated: June 6, 2016 00:38 IST2016-06-06T00:38:53+5:302016-06-06T00:38:53+5:30

कोका वन्यजीव अभयारण्य स्थित गाव चंद्रपूर (कोका) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कोका वन्यजीव विभाग,...

Environment Day in Coca Wilde | कोका अभयारण्यात पर्यावरण दिन

कोका अभयारण्यात पर्यावरण दिन

श्रमदान : पेंटिंगमधून पर्यावरण संदेश
भंडारा : कोका वन्यजीव अभयारण्य स्थित गाव चंद्रपूर (कोका) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कोका वन्यजीव विभाग, ग्रीन मार्इंडस् भंडारा व सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर (सीट) च्या संयुक्त अनुषंगाने सफाई अभियान व पर्यावरण जागृती कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये कोका वन्यजीव विभाग आणि तेथील कर्मचारी व ग्रीन मार्इंडस्, सीट या एनजीओचे स्वयंसेवकांनी तेथे पडलेला कचरा, पॉलिथिन पेपर, प्लास्टिक बॉटल, टाकाऊ पदार्थ एकत्रित केला व त्यांना कचरापेटीमध्ये जमा करुन विल्हेवाट लावली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजतापासून ते पूर्ण परिसर स्वच्छ होईपर्यंत स्वयंसेवकांनी श्रमदान करुन केली.
त्याचबरोबर परिसरामध्ये पेंटिंग करुन पर्यावरणासंबंधी सुविचार जसे वन्यजीव वाचवा, जंगल वाचवा, कचरा करु नये इत्यादी लिहून जनजागृती केली.
या पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कोका वन्यजीव अभयारण्याचे गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक, शेडगे वनपरिक्षेत्र अधिकारी, राजकमल जोब मानद वन्यजीव रक्षक भंडारा, वनकर्मचारी व वनमजूर उपस्थित होते.
तसेच ग्रीन मार्इंडस्च्या संध्या किरोलीकर व सीटचे सचिव शाहीद खान यांच्या नेतृत्वात साधना त्रिवेदी, स्वपना खंडाईत, यामेश्वरी पारधी, नितीन कुथे, विजय पारधी, प्रदीप धबाडे, रणजीत उजवणे, सरफराज खान, दिनेश अग्रवाल, अमित उजवणे, शैलेंद्र श्रीवास्तव, नाहीद परवेज, मंगेश मस्के, अयान, परवेज, सुबोध चवळे, शोएब अंसारी, रवी नशिने, चंद्रहायस सोनगडवाला, प्रतिक नशिने आदीनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Environment Day in Coca Wilde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.