बुद्धांच्या अस्थिदर्शनाकरिता उत्साह

By Admin | Updated: October 17, 2015 01:11 IST2015-10-17T01:11:27+5:302015-10-17T01:11:27+5:30

सम्राट अशोक यांच्या काळात भारतातून श्रीलंकेत गेलेल्या गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिचे श्रीलंकेवरून विशेष सजविलेल्या अस्थिकलश रथातून भंडाऱ्यात आगमन होताच ...

The enthusiasm for the Buddha's insight | बुद्धांच्या अस्थिदर्शनाकरिता उत्साह

बुद्धांच्या अस्थिदर्शनाकरिता उत्साह

दर्शनासाठी गर्दी : अस्थिकलशावर पुष्पवृष्टीचा वर्षाव
भंडारा : सम्राट अशोक यांच्या काळात भारतातून श्रीलंकेत गेलेल्या गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिचे श्रीलंकेवरून विशेष सजविलेल्या अस्थिकलश रथातून भंडाऱ्यात आगमन होताच बुद्धाच्या पवित्र अस्थिकलशाच्या दर्शनाकरीता भंडारेकर व दूरवरून आलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
साखरकर सभागृहाच्या प्रवेश द्वारासमोर अस्थिरथाचे पदार्पण होताच संयोजक रूपचंद रामटेके, अमृत बन्सोड व महेंद्र गडकरी यांनी कमलपुष्पाने अस्थिकलशाचे स्वागत केले. धम्ममंचावर प्रवेशद्वारावरून अस्थिकलश नेत असताना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या ठेवण्यात आलेल्या महिला उपासिकांनी अस्थिकलशावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर श्रीलंकेतील महाथेरो यांनी धम्मध्वजारोहण केले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. भारत-तिबेट समन्वय केंद्राचे समन्वयक जिग्मे त्सुलट्रीन यांचे संबोधन झाले. श्रीलंकेचे महाथेरो महिंद्रा व सुसिमा यांच्या धम्मपालन गाथेने बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाच्या दर्शनाला सुरूवात झाली. भंडाऱ्याचे नगराध्यक्ष बाबुराव बागडे व माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांनी धम्ममंचावर जाऊन अस्थिचे दर्शन घेवून स्वागत केले.
दुर्मिळ व ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होवून पवित्र अस्थिचे दर्शन घेण्याकरीता गर्दी उसळली होती. संपूर्ण सभागृह, चौक ते शिवाजी महाराज पुतळा हा संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. उपस्थित महिला व पुरूषांची पांढऱ्या वेशातील उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. समाजातील सर्वच थरातील मान्यवराबरोबरच अधिकारी व कर्मचारी यांनीही अस्थिचे दर्शन घेतले. यावेळी विविध देशातील बुद्धविहार व बुद्ध रूपांची लावण्यात आलेली चित्रप्रदर्शनी लोकांच्या ज्ञानात भर घालत होती.
शास्त्री चौक, गांधी चौक, पोस्ट आॅफिस चौक मार्गाने त्रिमुर्ती चौकापर्यंत अस्थिकलश रथाची निरोप रॅली काढण्यात आली. यावेळी रस्त्यावर ठिकठिकाणी अनेकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. संचालन, प्रास्ताविक व पश्चिम संयोजक अमृत बन्सोड यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्य संयोजक रूपचंद रामटेके यांनी केले.
कार्यक्रमासाठी महेंद्र गडकरी, डी.एफ. कोचे, भारत गोंडाने, गुलशन गजभिये, हरिश्चंद्र दहिवले, प्रशांत देशभ्रतार, किशोर मेश्राम, करण रामटेके, प्रतिभा मेश्राम, प्रभाकर भोयर, असित बागडे, संजय बन्सोड, सौरभ खापर्डे, भुपेश शेंडे, नरेंद्र बन्सोड, सुधाकर साठवणे, प्रतीक रामटेके, अस्वीन बडोले, जय बोरकर, सचिन हुमणे, एम.आर. राऊत, आदिनाथ नागदेवे, सिद्धार्थ मेश्राम, अजय तांबे, माणिकराव रामटेके, भाविका उके, माया उके, वासंती सरदार, हिवराज उके, मनोहर गणवीर यांनी सहकार्य केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मातंग सामाजिक स्मारक समिती भंडाराच्यावतीने अस्थिकलशांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रूबाल पवार, गणेश ढोके, बाबासाहेब जाधव आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The enthusiasm for the Buddha's insight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.