स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करा
By Admin | Updated: September 24, 2014 23:26 IST2014-09-24T23:26:41+5:302014-09-24T23:26:41+5:30
मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी स्वीप कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करावी. सर्व मदारांना मतदानाची तारीख आणि वेळ माहित होण्यासाठी प्रसार

स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करा
भंडारा : मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी स्वीप कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करावी. सर्व मदारांना मतदानाची तारीख आणि वेळ माहित होण्यासाठी प्रसार व प्रचार करावा अशा सूचना जागृकता निरीक्षक एल.मधू नाग यांनी दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या लाखनी, साकोली, तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील मतदान केंद्रांना नाग यांनी भेट दिली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. लाखनी येथील समर्थ महाविद्यालयातील मतदान केंद्र ११६, ११७, ११८ ची पाहणी केली. या केंद्रावरील बुथ लेवल अधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.राम आर्वीकर यांच्याशी चर्चा केली. महाविद्यालयातील विद्यार्थी, एन.एस.एस., एन.सी.सी.चे विद्यार्थी यांचा सहभाग घेऊन या मतदान क्षेत्राच्या भागात मतदानाविषयी वातावरण निर्मिती करावी, अशा सूचना दिल्या आहेत. साकोली येथील कमलाबाई कनिष्ठ महाविद्यालय एकोडी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, मतदार मदत केंद्र, तुमसर येथील नगर परिषद बांगळकर उच्च प्राथमिक शाळा, तुमसर येथील चिखला माईन आणि मोहाडी येथील कमी मतदान झालेल्या केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मतदानाविषयी जागृकता करण्यासाठी दुर्गोत्सवाच्या ठिकाणी मंडळाने पोस्टर, बॅनर लावावे, विद्युत बिल, पाणी बिल आणि गॅस सिलेंडरच्या पावतीवर मतदानाची तारीख आणि वेळ छापण्यात यावी, अशा सूचना केल्यात.
यावेळी त्यांच्यासोबत साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसीलदार हंसा मोहणे, तुमसरचे उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, तहसीलदार सचिन यादव, कल्याणकुमार डहाट, पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)