-अखेर कोंढीत पाणीपुरवठा सुरू
By Admin | Updated: May 14, 2015 00:23 IST2015-05-14T00:23:41+5:302015-05-14T00:23:41+5:30
सहा महिन्यांपासून कोंढी ग्रामवासीयांना खासगी व सार्वजनिक नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ...

-अखेर कोंढीत पाणीपुरवठा सुरू
जवाहरनगर : सहा महिन्यांपासून कोंढी ग्रामवासीयांना खासगी व सार्वजनिक नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील २० ते ३० महिलांनी ग्रामपंचायत गाठले होते. ‘लोकमत’ने ‘कोंढी येथे पाण्यासाठी हाहाकार’ या आशयाची बातमी प्रकाशित करताच दि. ११ रोजी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. पाणीपुरवठा होत असल्यामुळे कोंढीवासीयांनी 'लोकमत'चे आभार मानले.
गट ग्रामपंचायत कोंढी जवाहरनगर येथील पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणावर ग्रामस्थांचा रोष होता. त्याअनुषंघाने शुक्रवार, दि. ८ मे रोजी २० ते ३० महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत गाठले. यात सरपंच व काम करणारी यंत्रणा यांच्या विरूद्ध पाण्यासाठी ताशेरे ओढले.
गावात दोन जलकुंभ आहेत. मात्र मागील काळात नळधारकांना व सार्वजनिक नळाला पाणी येत नाही, असा आरोप उपस्थित महिलांनी केली. गावातील टिल्लूपंपाचा वापर असलेल्या नळधारकांवर कारवाही होत नाही.
जोपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही, तोपर्यंत पाणीकर देणार नाही, असा पावित्रा महिलांनी घेतला होता. या विषयी 'कोंढी येथे पाण्यासाठी होणारी समस्यांचे वार्तांकन केल्यानंतर ग्रामपंचायत यंत्रणा कामाला लागली. अखेर सोमवारपासून गावात पाणी पुरवठा सुरू झाला आहे. (वार्ताहर)
पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणी मोटारमध्ये हेराफेरी करण्यात आली. त्यामुळे अंत्यल्प पाणी मिळत होते. परिणामी तांत्रिक कारागीराकडून मोटरपंप दुरूस्त करण्यात आली. आता गावात पाणी सुरळीत सुरू आहे. दोषींवर कारवाई करणार आहे.
- मीरा सुखदेवे,
सरपंच, कोंढी.