अतिक्रमण हटाव पथकाने टाकली नांगी
By Admin | Updated: February 22, 2015 00:35 IST2015-02-22T00:35:16+5:302015-02-22T00:35:16+5:30
चांदपूर जलाशय वितरीकेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमण हटाव मोहिमेवर गेलेल्या पथकाला नागरीकांच्या विरोधामुळै नांगी टाकली.

अतिक्रमण हटाव पथकाने टाकली नांगी
तुमसर : चांदपूर जलाशय वितरीकेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमण हटाव मोहिमेवर गेलेल्या पथकाला नागरीकांच्या विरोधामुळै नांगी टाकली. अतिक्रमण हटाव पथकावर रिकाम्या हाताने माघारी परतण्याची नामूष्की आली.
चांदपूर गावात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. ते अतिक्रमण प्रथम काढा त्यानंतरच सिहोरा येथील चांदपूर जलाशय वितरीकेवरील अतिक्रमण काढू देऊ असा पवित्रा सिहोरा येथील नागरिकांनी घेतला. या प्रकारामुळे अतिक्रमण काढण्यास आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माघारी परतावे लागले. हा सर्व प्रकार राजकीय दबावामुळे घडला अशी परिसरात चर्चा आहे.
लघु पाटबंधारे विभागांतर्गत वितरीकेवर पक्के तथा कच्चे अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी संबंधित विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने विभागाने अतिक्रमणधारांना नोटीस पाठविण्यात आले होते, परंतु अतिक्रमणधारकांवर कोणताच फरक पडलानाही. संबंधित विभागाने पाऊल उचलण्याकरीता कंबर कसली.
अतिक्रमण स्थळी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी तथा पोलिस कर्मचाऱ्यांचा समवेत दाखल झाले. जून्या ग्रामपंचायत भवनाजवळ अधिकारी व अतिक्रमणधारकांत चर्चा झाली. यात चादंपूर जलाशयाच्या वितरीकेवर अनेक गावात अतिक्रमण करण्यात आले आहे. तेव्हा सिहोरा येथेच बुलडोजर चालविण्याचा निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न उपस्थित करुन प्रथम चांदपूर येथील अतिक्रमण काढा नंतर सिहोरा येथील अतिक्रमण काढण्यास या असा खडा सवाल अतिक्रमणधारकांनी केला.
अतिक्रमण काढण्याकरीता एक महिन्याचा आम्हाला वेळ द्यावा अशी मागणी अतिक्रमणधारकांनी संबंधित अधिकाऱ्यापुढे केली. एका महिन्यानंतर स्वत:च अतिक्रमण काढण्याची ग्वाही अतिक्रमणधारकांनी दिली. संबंधित विभागाने पुन्हा एका महिन्याची वेळ दिली. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचा उपविभागीय अभियंता बॅनर्जी, नायब तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, ठाणेदार रमेश इंगोले, शाखा अभियंता पुप्पलवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)