बोंडे येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण

By Admin | Updated: June 8, 2014 23:44 IST2014-06-08T23:44:25+5:302014-06-08T23:44:25+5:30

मोहाडी तालुक्यातील खडकी गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोंडे गावाशेजारील वन विभागाच्या जागेत कोका व ढिवरवाडा येथील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. सदर जागेत ढोरफोडी, क्रिकेटचे मैदान,

Encroachment at the place of forest department at Bonde | बोंडे येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण

बोंडे येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण

करडी (पालोरा) :   मोहाडी तालुक्यातील खडकी गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोंडे गावाशेजारील वन विभागाच्या जागेत कोका व ढिवरवाडा येथील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. सदर जागेत ढोरफोडी, क्रिकेटचे मैदान, आखर व मुरुम खदान असून गावाच्या हिताची आहे. त्वरित अतिक्रमण हटविण्याची मागणी वनहक्क समिती अध्यक्ष व सचिवाने केली आहे.
बोंडे गावात अतिक्रमण करणार्‍यांनी दंडुकेशाहीच्या बळावर अतिक्रमण करुन शेतजमीन तयार केली आहे. सदर जागा गावाच्या हिताची असून मोक्याचे ठिकाणी आहे. वनहक्क समितीच्या म्हणण्यानुसार सदर जमीन ही वनविभाग तुमसर यांच्या अधिकारात मोडते. बोंडे गाव जंगलालगत वसलेले असून सभोवतालच्या जागेवर कोका व ढिवरवाडा येथील नागरिकांनी बळजबरीने कुणालाही न जुमानता अतिक्रमण केले आहे.श
या संबंधाने गावकर्‍यांनी विरोध केला असता ते मानायला तयार नाहीत. उपरोक्त जागेसंबंधी ग्रामपंचायत कार्यालय खडकी येथील ग्रामसेवकाला माहिती देण्यात आली. त्यांनी ग्रामसभेत विषय घेण्याचे तोंडी मान्य केले. मात्र अजूनही ग्रामसभा घेतलेली नाही. वनहक्क समितीच्या सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रकरण लांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकात मौक्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाने आक्रोशाची भावना आहे. मात्र कुणाकडूनही न्याय मिळताना दिसत नाही. सदर अतिक्रमण वन विभागाच्या गटनंबर ६५ व ६६ मध्ये आहे. त्याच जागेत ढोरफोडी, क्रिकेटचे मैदान,  आखर व मुरुमाची खदान आहे. सदर जागा अतिक्रमणमुक्त होणे गावाच्या हिताचे आहे. वनविभागाने तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी, अतिक्रमण काढण्याची मागणी वनहक्क समिती अध्यक्ष पतीराम वाढवे, सचिव मधुकर ठाकरे यांनी केली आहे. सदर जागा मोकळी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Encroachment at the place of forest department at Bonde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.