अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:27 IST2018-12-09T00:26:22+5:302018-12-09T00:27:08+5:30
शहरातील अत्यंत ज्वलंत समस्या ठरलेल्या अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सलग दुसºया दिवशीही राबविण्यात आली. विशेष म्हणजे शहर हद्दीपेक्षा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. यात शासकीय जागेवर लावलेले शासकीय होर्डिंगच काढण्यात आले.

अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील अत्यंत ज्वलंत समस्या ठरलेल्या अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सलग दुसºया दिवशीही राबविण्यात आली. विशेष म्हणजे शहर हद्दीपेक्षा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. यात शासकीय जागेवर लावलेले शासकीय होर्डिंगच काढण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गासोबतच शहरातही नगरपरिषदेच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आली. शास्त्री चौकात या मोहिमेला प्रारंभ झाला. परंतु व्यवसायीकांनी दुसऱ्या दिवशीही रात्रीच आपले अतिक्रमण या ठिकाणावरून हटविल्याचे दिसून आले. राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी महामार्गावरील शंभरावर अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. तर या मोहिमेचा धसका घेत अनेक व्यवसायीकांनी आपले अतिक्रमणातील दुकान स्वत:च हटविले. महामार्ग प्राधीकरण, बांधकाम विभाग, नगरपरिषद, महसूल प्रशासन, पोलिसांच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जात आहे.