पवनीत संतप्त नागरिकांचा वीज अभियंत्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:21 IST2017-10-05T00:21:20+5:302017-10-05T00:21:33+5:30
नगरात सुरु असलेल्या सहा तासाचे लोडशेडींगमुळे त्रस्त झालेले व्यापारी महावितरणचे पावरहाऊसवर धडकले आणि सहायक अभियंत्यांना घेराव करून लोडशेडींग बंद करा अशा घोषणा देऊ लागले.

पवनीत संतप्त नागरिकांचा वीज अभियंत्यांना घेराव
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नगरात सुरु असलेल्या सहा तासाचे लोडशेडींगमुळे त्रस्त झालेले व्यापारी महावितरणचे पावरहाऊसवर धडकले आणि सहायक अभियंत्यांना घेराव करून लोडशेडींग बंद करा अशा घोषणा देऊ लागले. विद्युत बंद किंवा सुरु ठेवणे स्थानिक अधिकाºयांचे अधिकारात नाही. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही आणि पवनीचा अर्धा भाग तीन तास अंधारात राहिला.
व्यापारी व व्यापारी संघाचे पदाधिकारी पावर हाऊसवर धडकले. याची माहिती नगर विकास आघाडीचे प्रमुख विलास काटेखाये यांना माहिती झाल्याने त्यांनी पावर हाऊस गाठले व वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली. गुरूवारला दुपारी १२ वाजता महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. त्यामुळे घेराव आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. परंतु पवनी नगरातील सायंकाळी होणारी तीन तासांची लोडशेडींग बंद न केल्यास आंदोलन करण्यात येईल. अशी धमकीवजा सूचना व्यापाºयांनी उपस्थित अधिकाºयांना दिलेली आहे. ‘अच्छे दिन आये है’ अशा घोषणा देत व्यापारी घरी परतले.