मिरची तोडणीमुळे महिलांना मिळतोय रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:30 IST2019-03-13T22:29:33+5:302019-03-13T22:30:15+5:30

परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.

Employment from women due to chilli breaking | मिरची तोडणीमुळे महिलांना मिळतोय रोजगार

मिरची तोडणीमुळे महिलांना मिळतोय रोजगार

ठळक मुद्देतोड्याचा हंगाम अंतिम टप्यात : अड्याळ परिसरात अनेक ठिकाणी मिरचीचे उत्पादन

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.
रबीचे क्षेत्र घटले असल्यामुळे महिलावर्गाला ग्रामीण भागात काम मिळेणासे झाले आहे. त्यामुळे मिरची तोड्याचा हंगाम परिसरातील महिलांसाठी फायदेशीर ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी महिलांनी बोलताना दिली.
अड्याळ आणि परिसरातील शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे. शेतीला पूरक व्यवसाय उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील मिरची पिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पिक आहे. धानपिकातून शेतकºयांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही . त्यातही गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती गोसे धरणात गेली असल्याने येथील कामगारांना मजूरीशिवाय दुसरा पर्याय नाही.
महिला मजुरांना दहा रुपये किलो दराप्रमाणे पैसे मिळत असल्याने दिवसाकाठी प्रत्येक महिलेला दिडशे ते दोनशे रुपये रोजगार उपलब्ध होत आहे. आणखी काही दिवस मिरची तोड्यासह रबीचा हंगाम सुरु असल्याने काही दिवस तरी रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिला मजूर आनंदीत आहेत.
रोहयो कामाची गरज
शेतकरी वर्गाला यावर्षी निसर्गाचा फटका बसल्याने खरीप पिकाचे उत्पन्न मिळाले नाही. रबीचीही पेरणी न झाल्याने शेतकऱ्यांना सध्या उसणवार करुन व्यवहार करावे लागत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना बँकेचे पीक कर्ज सोसायट्या भरणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे शासनाने गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे सुरु करुन मजुरांना दिलासा देण्याची गरज आहे.

Web Title: Employment from women due to chilli breaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.