रोजगार सेवकाची मनमानी
By Admin | Updated: May 27, 2014 23:30 IST2014-05-27T23:30:49+5:302014-05-27T23:30:49+5:30
गावातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. कुणीही कामाकरिता गाव सोडू नये. पारदर्शकता राहण्याकरीता रोजगार सेवक पदाची निर्मिती करण्यात आली. असे असले तरी पालांदूरजवळील वाकल येथे

रोजगार सेवकाची मनमानी
पालांदूर : गावातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. कुणीही कामाकरिता गाव सोडू नये. पारदर्शकता राहण्याकरीता रोजगार सेवक पदाची निर्मिती करण्यात आली. असे असले तरी पालांदूरजवळील वाकल येथे रोजगार सेवकाने स्वमर्जीने नर्सरीच्या कामात गैरव्यवहार करून शासकीय निधीचा दुरूपयोग केल्याचा आरोप गावकर्यांनी केला. वरिष्ठांना दिलेल्या निवेदनानुसार, वाकल येथे मग्रारोह अंतर्गत नर्सरीचे काम हाती घेण्यात आले. या कामावर दोन चौकीदार म्हणून जितेंद्र जनबंधू व दुर्याेधन ठवकर असताना दुसर्यालाच चौकीदार म्हणून दाखवून तिच्या नावे जमा झालेली रक्कम स्वत:च बँक खात्यातून काठण्यात आली. तसेच मनोहर बावणे, रामधन चंदनबावणे, कुसुम बावणे, राजहंस वाघमारे, यमू उके रा. सर्व वाकल यांचे बँक खाते पासबुक स्वत: बँकेत नेऊन रक्कम हडप केल्याचा सुद्धा आरोप दिलेल्या निवेदनात पृथ्वीराज जिवलग जनबंधू यांच्यासह २३ लोकांनी केला आहे. निवेदन जिल्हाधिकारी भंडारा, तहसीलदार लाखनी, वनविभाग भंडारा, खंडविकास अधिकारी लाखनी, वनक्षेत्र कार्यालय लाखांदूर, विदर्भ कोकण ग्रामीण बँक लाखांदूर यांच्याकडे देण्यात आले आहे. चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. (वार्ताहर)