शिक्षणासहीत रोजगाराच्याही संधी

By Admin | Updated: February 8, 2015 23:29 IST2015-02-08T23:29:40+5:302015-02-08T23:29:40+5:30

स्व. मनोहरभाई पटेल याांनी भंडारा-गोंदिया जिल्हात शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली. कष्टाने उभारलेल्या शिक्षण

Employment opportunities with education | शिक्षणासहीत रोजगाराच्याही संधी

शिक्षणासहीत रोजगाराच्याही संधी

भंडारा : स्व. मनोहरभाई पटेल याांनी भंडारा-गोंदिया जिल्हात शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली. कष्टाने उभारलेल्या शिक्षण संस्थेचा आज मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये रोजगारही मिळवून देणे हे गोंदिया शिक्षण संस्थेचे ध्येय असून लवकरच ते पूर्ण करण्यात येईल, असा निर्धार गोंदिया शिक्षण संस्थेचे संरक्षक खासदार प्रफुल पटेल याांनी केला.
येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या सुर्वण महोत्सव समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष मुकेश पटेल, सचिव आ. राजेंद्र जैन, माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे, अनिल बावनकर, मधुकर कुकडे, धनंजय दलाल, अ‍ॅड. जयंत वैरागडे उपस्थित होते.
खा. प्रफुल पटेल म्हणाले, काळ झपाट्याने बदलतो आहे. त्यासोबत या भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा व पोषक वातावरण देणे आवश्यक आहे. त्या साऱ्याांची परिपूर्ती संस्थेच्या महाविद्यालयाद्वारे केली जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांना विद्यार्थी मिळतातच. जे. एम. पटेल महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव ही त्याचीच साक्ष होय. या सुवर्ण महोत्सवी समारंभांतर्गत प्रख्यात शास्रज्ञ आणि नोबल पारितोषिक विजेते यांनाही या महाविद्यालयात अतिथी म्हणून बोलावण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रास्ताविक प्राचार्य विकास ढोमणे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा वेध घेत महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या अद्ययावत साधनांचा व सुवर्ण महोत्सवाप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमाचा परिचय दिला. या प्रसंगी बंडूभाऊ सावरबांधे, अनिल बावनकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ‘उन्मेष’ या महाविद्यालयीन वाष्र्कििांकाच्या सुवर्ण महोत्सवी अंकाचे विमोचन प्रफुल पटेल यांनी केले.
या सोहळ्यात विद्यापीठ स्तरावर गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंचा गौरवही अतिथींच्या हस्ते करण्यात आला. प्रा. डॉ. शाम डफरे यांनी बँकाक येथे सादर केलेल्या शोधनिबंधाला प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
या अतिशय नेटक्या कार्यक्रमाची सांगता मुंबईच्या ‘सॅफ्रॉन अँड जो’ यांच्या रॉक बँड या रंगारंग कार्यक्रमाने झाली. या जोशपूर्ण संगीतमय कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सा रे ग म विजेता रोन्किनी गुप्ता - अरोरा, आरोही म्हात्रे आणि शुभंकर दत्ता यांनी युवकांना प्रिय असलेली गीते सादर केली व त्यांच्या ठेक्यावर सर्वांना रिझविले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी, निमंत्रित व प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Employment opportunities with education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.