शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टल बॅलेट पेपर न आल्याने कर्मचारी राहणार मतदानापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:33 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तक्रार देऊनही मागणीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : निवडणूक प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट मतदानासाठी फॉर्म नंबर १२ भरून दिला. शेवटचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टपाली मतपत्रिका मतदान सुरू झाले. दरम्यान, अनेकांनी बॅलेट न मिळाल्याची तक्रार जिल्हा निवडणूक विभागाकडे केली होती. तरीही व्यवस्था करण्यात आली नाही. १९ नोव्हेंबर रोजी निवडणूक कर्तव्यावर जाणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना मतदानासाठी पोस्टल बॅलेट न मिळाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत रोषाचे वातावरण आहे.

निवडणूक कामासाठी नियुक्त अनेक कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट मतदानास अडचणी येत आहेत, तसेच पोस्टल बॅलेट उपलब्ध न झाल्याने मतदानापासून अनेकांना वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा भंडारा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय कोलते यांना रविवारी दिलेल्या निवेदनातून केली होती. परंतु, अपेक्षित सुधारणा झालेली नाही त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या तीन मतदारसंघांत नियुक्त कर्मचाऱ्यांना १९ नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर जाण्यापूर्वी पोस्टल बॅलेट मिळाले नाही. त्यामुळे ते मतदानापासून वंचित आहेत. मतदानापासून वंचित कर्मचाऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. 

"निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्यासाठी फॉर्म १२ न भरणे, फार्म अपुरे भरणे किंवा कागदपत्रे न जोडणे, अशी दोन कारणे महत्त्वाची असतात. मतदानासाठी फार्म भरण्याची १३ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. ज्यांनी फॉर्म भरले व कागदपत्रे परिपूर्ण होती त्यांनी मतदान केले आहे. काहींचे बॅलेट पेपर अद्यापही पडून असून काहींनी मतदान केले नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी साकोली, तुमसर व भंडारा येथे मतदानाची सुविधा उपलब्ध केली. तसेच जेथून मतदान साहित्य वितरित करण्यात आले तिथेही मतदानाची सुविधा होती. पोस्टल बॅलेटमध्ये चुका चालत नाही. फॉर्मवर सही नसणे, अनुक्रमांक नसणे आदी कारणेही असतात. त्यामुळे फॉर्म भरताना बारकावे लक्षात घेतले पाहिजेत. ज्यामुळे अडचणी येत नाहीत."- प्रशांत पिसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडारा