बिबट्याच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांचे अपडाऊन
By Admin | Updated: November 23, 2014 23:12 IST2014-11-23T23:12:45+5:302014-11-23T23:12:45+5:30
जांभळी येथील महिलेला ठार केल्यानंतर या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून त्याला गडेगाव आगार येथे ठेवण्यात आले आहे. मात्र या बिबट्याच्या सुरक्षेसाठी दररोज दोन वनरक्षक व तीन

बिबट्याच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांचे अपडाऊन
साकोली: जांभळी येथील महिलेला ठार केल्यानंतर या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून त्याला गडेगाव आगार येथे ठेवण्यात आले आहे. मात्र या बिबट्याच्या सुरक्षेसाठी दररोज दोन वनरक्षक व तीन वनकामगार ये जा करीत आहेत. हा वनविभागावर अतिरिक्त खर्च असून वनविभागाने जर या बिबट्याला साकोली किंवा जांभळी, नर्सरी येथे ठेवले असते तर वनविभागाचा हा खर्च वाचविता आला असता.
दि. ५ रोजी या बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर रात्रीच त्याला पिटेझरी येथे नेण्यात आले. त्यानंतर याला ठेवायचे कुठे यावर वनअधिकाऱ्यांची चर्चा झाली. यावेळी याला गडेगाव, आगार, साकोली नर्सरी किंवा जांभळी नर्सरी येथे ठेवण्यावर विचार सुरु होता. मात्र साकोली व जांभळी येथील नर्सरीत जर ठेवले तर बघण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाढेल. त्यामुळे त्याला गडेगाव येथे ठेवण्यात आले. मात्र गडेगाव येथे फक्त दोन वनरक्षक एवढेच कर्मचारी असल्याने त्याला सुरक्षेसाठी साकोलीवरून सकाळपाळीसाठी एक वनरक्षक व एक वनमजूर तर रात्रपाळीसाठी एक वनरक्षक व दोन वनकर्मचारी ये जा करीत आहेत. दररोज साकोलीचे वनक्षेत्राधिकारी व सहाय्यक वनसंरक्षक हे पाहणी करून येतात. (तालुका प्रतिनिधी)