शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

सभापतींच्या भेटीने कर्मचाऱ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 10:16 PM

जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी कर्तव्यावर नाममात्र राहत असल्याच्या तक्रारी शिक्षण व अर्थ समिती सभापती धनेंद्र तुरकर यांना प्राप्त झाल्या होत्या.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रकार : अनेक कर्मचारी आढळले गैरहजर

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी कर्तव्यावर नाममात्र राहत असल्याच्या तक्रारी शिक्षण व अर्थ समिती सभापती धनेंद्र तुरकर यांना प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास तुरकर यांनी अचानक शिक्षण विभागाला भेट दिली. यावेळी अनेक कर्मचारी टेबल सोडून इतरत्र गेल्याचे आढळून आले. सभापतींच्या भेटीने येथील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.जिल्हा परिषदचा शिक्षण विभाग मागील काही दिवसांपासून अनेक प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. येथे नियमित शिक्षणाधिकारी यांचे पद नसल्याने कर्मचारीही जागेवर दिसून येत नाही. शिक्षण विभागाशी संबंधित प्रकरणासाठी दुरवरुन आलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी किंवा ग्रामस्थांना येथील कर्मचाऱ्यांची तातकळत वाट बघावी लागते. अनेकांना अनेकदा आल्यापावली परतावे लागत असल्याने अनेकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.अनेकदा येथील काही कर्मचारी केवळ ‘चिरीमिरी’ मिळावी या हेतूने काम घेवून आलेल्या व्यक्तीला आल्या पावली परत पाठवित असल्याच्या संतापजनक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या. मात्र या तक्रारींकडे आजपर्यंत दुर्लक्षच करण्यात आले. अशा गंभीर प्रकारामुळे शिक्षण विभागातील कारभार चव्हाट्यावर आला.जिल्हा परिषदच्या सभापती पदांचे खांदेपालट नुकतेच झाले. शिक्षण सभापती म्हणून धनेंद्र तुरकर यांनी प्रभार सांभाळला आहे. त्यांनी शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराची दखल घेतली असून मंगळवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, जि.प. सदस्य प्रेरणा उमेश तुरकर, गिता राजु माटे, उत्तम कळपाते यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात आकस्मित भेट दिली. यावेळी काही कर्मचारी कर्तव्य बजावत असल्याचे आढळून आले. काही कर्मचारी रजेवर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तर काही कर्मचारी कक्षाबाहेर गेल्याचा गंभीर प्रकारही आढळून आला. बाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांबाबद माहिती घेतली असता त्यांची हलचल रजिस्टरमध्येही नोंद आढळून आली नसल्याने या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी शिक्षणाधिकारी यांना दिल्याचे समजते. कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.फोनच्या संदेशाने कर्मचारी हजरशिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी शिक्षण विभागात भेट दिली असून ते कक्षाबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेत असल्याचा संदेश तेथे उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी बाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविला. काहींनी मोबाईल व्हॅटस्अ‍ॅपद्वारे संदेश पाठविला तर काहींनी फोन करुन त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाईतून वाचविण्यासाठी तातडीने कक्षात येण्याचा सुचना दिल्या. सभापतींच्या या भेटीने येथील कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.कर्मचाऱ्यांना दिलेल्या मध्यान्ह रजेच्या शासकीय वेळेतच कक्षाबाहेर जावे. कर्तव्यावर उपस्थित राहून आलेल्या व्यक्तींचे कामे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता करावी, यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही.- धनेंद्र तुरकर, सभापतीशिक्षण व अर्थ समिती जि.प. भंडारा