रोजगार हमी योजनेच्या कामात खळबळजनक गौप्यस्फोट

By Admin | Updated: December 1, 2014 22:49 IST2014-12-01T22:49:25+5:302014-12-01T22:49:25+5:30

तालुक्यातील गराडा (बु.) येथे झालेल्या मनरेगाच्या नाला सरळीकरणाच्या कामात दुर्लक्ष झाल्यामुळे व दस्तावेजात खोडतोड आहे. त्यामुळे गैरव्यवहाराचा संशय बळावला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीने

Emotional Explosive in the Work of Employment Guarantee Scheme | रोजगार हमी योजनेच्या कामात खळबळजनक गौप्यस्फोट

रोजगार हमी योजनेच्या कामात खळबळजनक गौप्यस्फोट

भंडारा : तालुक्यातील गराडा (बु.) येथे झालेल्या मनरेगाच्या नाला सरळीकरणाच्या कामात दुर्लक्ष झाल्यामुळे व दस्तावेजात खोडतोड आहे. त्यामुळे गैरव्यवहाराचा संशय बळावला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत विषय चर्चेला घेऊन गैरवर्तुणुकीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश खंडविकास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालातून दिला आहे.
ग्रामपंचायत गराडा (बुज) मार्फत दि. २ मे ते ८ जून २०१३ पर्यंत मनरेगा अंतर्गत नाला सरळीकरणाचे काम करण्यात आले. या कामावर प्रसूती झालेल्या महिलेच्या नावावर मजूरी देण्यात आली.
या कामावर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, रोजगार सेवक, ग्रामपंचायत सदस्याच्या मुलगा आदी कामावर दाखविण्यात आले आहे. दस्ताऐवजावर गैरहजेरीच्या ठिकाणी खोडतोड करुन हजेरी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे इच्छूक मजुरांचे नुकसान झाले आहे. मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन प्रकरणाची चौकशी करावी, दोषीवर कार्यवाही व्हावी, अशी मागणी जिल्हा व तालुका प्रशासनाकडे करण्यात आली. या प्रकरणाची खंडविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात चौकशी करण्यात आली. या चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे उघडकीस आले आहे.
नलीनी सार्वे रा. गराडा बु. यांची १७ मे २०१३ रोजी प्रसूती झाली. त्या त्याच दिवशी दुपारनंतर प्रसूतीसाठी निघाल्याचे म्हणणे आहे. तत्पूर्वी त्यांनी काम सुरळीत करुन तीला मजूरी देण्यात आली आहे. प्रसूतीनंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून मजूरीच्या कामावर देखील येणे ही संशयास्पद आहे. तुरसा अजाबराव प्रत्येकी ही मनरेगाच्या कामावर ८ मे ते ८ जूनपर्यंत हजर आहेत.
त्या दरम्यान १५ मे रोजी पती अजाबराव प्रत्येकी यांचे निधन झाले होते. हे मात्र विशेष तसेच ग्राम पंचायत सदस्य महादेव हलमारे, पंचायत समिती सदस्या निलीमा गाढवे, सरपंच नंदकिशोर गाढवे, रोजगार सेवक सुभाष सार्वे, ग्रामपंचायत सदस्या साधना गोंडाणे यांचा राहूल गोंडाणे आदी नाला सरळीकरण कामावर मजूर असल्याचे दाखविण्यात आले आहे.
दस्तावेजावर खोडतोड केल्यामुळे संशय बळावत आहे. या कामाचे सामाजिक लेखा अंकेक्षण ग्रामसभेच्या ठरावानुसार झालेले असून खर्च व उपस्थिती विषयी आक्षेप नोंदविलेला नाही. त्यामुळे या कामामध्ये दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
यासंबंधाने ग्राम सभेत विषयाला घेवून उलगडा करावा, गैरवर्तुणूकीबाबत कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश चौकशी अहवालात खंडविकास अधिकारी यांनी दिले आहे. ग्रामसभेत कुणावर कार्यवाही होते याकडे भंडारा तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Emotional Explosive in the Work of Employment Guarantee Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.