रुग्णालयातील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:26 IST2018-07-14T22:26:09+5:302018-07-14T22:26:40+5:30
भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांनी सामान्य रुग्णालय येथे शल्य चिकित्सक यांची भेट घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयाची आढावा बैठक घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक मिनाक्षी थोरात जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारी, आर. एम. ओ. वडे, डॉ. जक्काल या बैठकीमध्ये कार्यकारी अभियंता नंदनवार, उपकार्यकारी सावरकर, शाखा अभियंता कुकडे उपस्थित होते.

रुग्णालयातील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांनी सामान्य रुग्णालय येथे शल्य चिकित्सक यांची भेट घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयाची आढावा बैठक घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक मिनाक्षी थोरात जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारी, आर. एम. ओ. वडे, डॉ. जक्काल या बैठकीमध्ये कार्यकारी अभियंता नंदनवार, उपकार्यकारी सावरकर, शाखा अभियंता कुकडे उपस्थित होते.
सामान्य रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना सुविधा मिळाल्या पाहिजे व औषधी मिळाली पाहिजे. रुग्णालयात स्वच्छता ठेवण्यात यावी. डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात. नवीन बिल्डींगचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, महिला रुग्णालयाचे टेंडर प्रक्रिया करण्यात येऊन बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे. या बाबतचे निर्देश खासदारांनी दिले.
यावेळी प्रदेश सचिव धनंजय दलाल, तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, विजय खेडीकर, बाळा गभणे, यशवंत सोनकुसरे, डॉ. रविंद्र वानखेडे, जि.प. सदस्य उत्तम कळपाते, हितेश सेलोकर, हिमांशू मेंढे, आरजू मेश्राम व अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.