१०८६ सेवाविषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:13 IST2017-10-05T22:13:36+5:302017-10-05T22:13:47+5:30
शासकीय सेवेत अख्खे आयुष्य सेवा करून जर स्वत:च्या समस्या निकाली काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर त्यांचा शासकीय कामावर परिणाम होऊन प्रशासकीय कामाची गती मंदावत असते.

१०८६ सेवाविषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय सेवेत अख्खे आयुष्य सेवा करून जर स्वत:च्या समस्या निकाली काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर त्यांचा शासकीय कामावर परिणाम होऊन प्रशासकीय कामाची गती मंदावत असते. सामान्य माणसाला एखाद्या विभागाकडून स्वत:ची समस्या निकाली निघण्याची अपेक्षा असते, त्याच प्रमाणे अधिकारी, कर्मचारीही अपेक्षा बाळगून असतात. जर ती समस्या एखाद्या अधिकाºयांच्या नजरेतून गेली आणि त्यावर उपायाची फूंकर लागली तर प्रशासनाचा कारभार गतीने चालेल यात शंका नाही.
भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी जिल्हा परिषद मधील विभागांना स्वच्छ व सुंदर करण्यासोबतच अधिकारी, कर्मचारी यांच्या अंतर्गत समस्यांचा अभ्यास केला. अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या निकाली निघाल्याशिवाय प्रशासनाची गाडी तेज गतीने पळणार नाही या निष्कर्षाप्रत पोहचून कालबद्ध वेळेत सेवाविषयक प्रकरणे निकाली काढण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. सामान्य प्रशासनाच्या कार्यकुशलतेने व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार २५ सप्टेंबरपर्यंत १०८६ प्रकरणे निकालात काढून अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशासनातील कार्य गतीने करण्यासाठी मनोबल वाढविले आहे.
एखाद्या अभियानाच्या काळात आणि कालबद्ध वेळेत ऐवढे प्रकरणे निकाली काढण्याचा हा पहिलाच इतिहास आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रशासकीय कामकाज कार्य कुशलतेचा परिचय देणारे ठरले आहे.
देशभर १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे मार्गदर्शनात संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हे अभियान राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी करून स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. शपथ घेण्यापासून तर वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छता करण्यापर्यंत विविध उपक्र्रमाची अंमलबजाणी करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने यात पुढाकार घेवून जिल्हा परिषद स्तरावर विविध विभागांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या आवाहनाला साद प्रतिसाद देत कर्मचाºयांनी स्वत:चे टेबलापासून तर स्टोअर रूपपर्यंत कार्यालय झाडून काढली.
सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी ते टास्क चॅलेज म्हणून स्विकारत स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या काळातच अधिकारी कर्मचारी यांचे सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्या प्रकरणांची पडताळणी करून स्वच्छता ही सेवा अभियानाच्या काळात २५ सप्टेंबरपर्यंत तब्बल १०८६ प्रकरणे निकाली काढली काढण्यात आली आहेत. प्रकरणाची संख्या ४१० पहिला, दुसरा लाभ मंजूर झालेले प्रकरणाची संख्या २०२, परिविक्षाधीन समाप्ती मंजूर झालेले प्रकरणाची संखया ५२, संगणक परिक्षा पास होण्यापासून सुट प्रकरणाची संख्या ७३, सेवाप्रवोशोत्तर परीक्षा पासून सुट प्रकरणाची संख्या १३, मराठी, हिंदी परिक्षापासून सुट प्रकरणाची संख्या ३२७, वैद्यकीय देयके मंजुर झालेल्या प्रकरणाची संख्या ९ असे १०८६ सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. अधिकारी कर्मचारी यांचे सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्याचे कार्य सामान्य प्रशासन विभागाने संबंधित विभाग प्रमुखांच्या सहायाने वेळेत पूर्ण केले आहे.