गावकऱ्यांचा प्रशासनाविरूद्ध एल्गार
By Admin | Updated: October 15, 2014 23:16 IST2014-10-15T23:16:37+5:302014-10-15T23:16:37+5:30
गर्भात असलेल्या धान पिकांना संजिवनी ठरणारा पाणी मिळावा यासाठी मोहगाव देवी येथील मतदारांनी पेंच प्रकल्पाच्या प्रशासनाविरूद्ध मतदान बहिष्काराचा एल्कार पुकारला परंतु गावकऱ्यांच्या मागण्या

गावकऱ्यांचा प्रशासनाविरूद्ध एल्गार
मोहाडी : गर्भात असलेल्या धान पिकांना संजिवनी ठरणारा पाणी मिळावा यासाठी मोहगाव देवी येथील मतदारांनी पेंच प्रकल्पाच्या प्रशासनाविरूद्ध मतदान बहिष्काराचा एल्कार पुकारला परंतु गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने प्रशासना विरूद्ध गाव कऱ्यांच्यामध्ये संताप दिसत होता. या बहिष्कारात गावकऱ्यांच्या प्रत्यक्षपणे विजय झाला, असे प्रशासनाच्या मुजोरीमुळे मोहगावात मतदान तर झाले नाही व मतदानाच्या हत्याराचे वापर कयन पेंच प्रकल्पाचे पाणी मिळेल ही आशा असताना प्रशासनाने गावकऱ्यांना इंगा दाखल्याचे स्पष्ट दिसून आले.
पेंच प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अशी सातत्याने मोहगाव देवी येथील शेतकऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी भंडारासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तहसीलदार मोहाडी यांनी सोमवारी ग्रामपंचायतमध्ये येवून प्रशासनातर्फे बहिष्कार मागे घेण्याची विनंती मोहगाव वासियांना केली. पाणी आणून देण्याची स्वत: जबाबदारी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी स्विकारली. पाणी आले, कोरडा नहर ओला झाला. परंतु पुन्हा पाणी बंद झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी एक मिटरचे गेज पाणी देत असाल तर मतदान करू या अटीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरपंच राजेश लेंडे यांच्या वतीने करण्यात आला. पण पेंचचे पाणी न आल्याने मोहगाव देवी येथील मतदारांचा बहिष्कार कायम होता. एका पाण्यासाठी धान पिक डोळ्यापुढे जात असताना पेंच प्रकल्पाचे अभियंता गोडनाले यांनी जाणीवपूर्वक मोहगावदेवी उपवितरीकेला धानाच्या पिकाला पाणी पोहचू दिले नाही. पेंचचा पाणी तात्काळ मिळावा यासाठी सरपंच राजेश लेंडे, ग्यानीराम साखरवाडे, वसंता लांबट, रामा लांजेवार, शरद लांबट, देवराव लेंडे, विनोद बालपांडे आदी गावकऱ्यांनी प्रयत्न केले. पण, प्रशासनाने अखेरपर्यंत मोहगावच्या शेतकऱ्यांना इंगा दाखविला.
अखेर बहिष्कारात पूर्ण गावकरी सामिल झाले होते. या बहिष्कारात एकीचे दर्शन बघायला मिळाले. (तालुका/शहर प्रतिनिधी)