इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांना बाजार समितीत ‘खो’

By Admin | Updated: December 6, 2015 00:23 IST2015-12-06T00:23:23+5:302015-12-06T00:23:23+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची मोजमाप इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने करण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहे.

Electronic Weightlifting 'Lose' in Market Committee | इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांना बाजार समितीत ‘खो’

इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांना बाजार समितीत ‘खो’

व्यापाऱ्यांची अनास्था पणन संचालकांच्या आदेशाची पायमल्ली !
प्रशांत देसाई  भंडारा
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची मोजमाप इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने करण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहे. या आदेशाला सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, आजही परंपरागत वजनकाट्यानेच कृउबात मालाची मोजमाप बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अचूक मोजमाप होण्यासाठी बाजार समितीसह आडत व्यापाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविण्याचे पणन संचालकांचे आदेश असले तरी या आदेशास जिल्हाभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी हरताळ फासल्याचेच चित्र सध्या दिसून येत आहे. कारवाईचे अधिकार असतानाही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई केली नसल्याने त्यांचे फावले आहे.
जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखांदूर या तालुक्यांची स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. मात्र, तुमसर - मोहाडी व साकोली - लाखनी या चार तालुक्याला दोन कृषी उत्पन्न बाजार समिती अशा जिल्ह्यात पाच कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. मात्र अनेक कृउबांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. भंडारा येथे इलेक्ट्रॉनिक व पारंपारिक साधे वजनकाटे असतानाही जुन्या वजनकाट्यानेच मालाची खरेदी-विक्री होत आहे.
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांना खो दिला जात आहे. साध्या वजनकाट्याचा वापर व्यापारी व आडते करताना दिसून येत आहेत. या काट्यांमुळे व्यापारिवर्गाला काही प्रमाणात फायदा होत असल्याने, तर इलेक्ट्रॉनिक काट्यावर अचूकता येऊन नुकसान होत असल्याने हे काटे वापरले जात नसल्याचा आरोप आहे.
कारवाईला सर्वत्र खो
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितींचे कार्यक्षेत्र तालुकाभर आहे. मात्र, यावर्षी निसर्गाच्या फटक्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेतीतील उत्पादन कमी झाल्याने मालाची आवक अल्प आहे. कृउबात नऊ ते दहा व्यापारी असून सर्वांकडे पारंपरिक पद्धतीचे वजनकाटे असल्याची माहिती आहे. अनेक वर्षांपासून हीच स्थिती आहे.

वर्षभरात दोनदा स्मरणपत्र
४ पणन संचालकांच्या २०१३ मध्ये काढण्यात आलेल्या आदेशानंतरही अंमलबजावणी न झाल्याने १० एप्रिल २०१४ व ३० मे २०१४ रोजी पुन्हा आदेशाबाबत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींना स्मरणपत्र बजावण्यात आले. घडीचा (पारपंरिक) वजनकाट्यामुळे व्यापाऱ्यांचा मोठा फायदा होत असल्याने इलेक्ट्रॉनिक काटा बसवण्यास तयार होत नाहीत. दरवर्षी वजनकाट्याचे प्रमाणिकरण केले जाते. कृषी उत्पन्न बाजार समितींचे कार्यक्षेत्र, आवक अत्यंत कमी आहे. लवकरच इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवून नियमांचे पालन केले जाईल, असे समिती प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, आदेशाची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही.

पणन महासंघांच्या संचालकांच्या आदेशानुसार बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविण्यात आले आहेत. बाजार समितीतील व्यापाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविण्याबाबत सूचना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या वजनकाट्यांवर विश्वास नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दोन्ही वजनकाट्यावर मालाची मोजणी करण्यात येते.
- रामलाल चौधरी,
सभापती, कृषी उत्त्पन्न
बाजार समिती, भंडारा.

Web Title: Electronic Weightlifting 'Lose' in Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.