वीज कोसळून दोन बैल ठार, मदतीची मागणी

By Admin | Updated: May 28, 2016 00:32 IST2016-05-28T00:32:20+5:302016-05-28T00:32:20+5:30

आकाशात अचानक ढग दाटून आले. पाहता-पाहता विजांचा कडकडाट झाला.

Electricity killed two bulls and helped them | वीज कोसळून दोन बैल ठार, मदतीची मागणी

वीज कोसळून दोन बैल ठार, मदतीची मागणी

तुमसर: आकाशात अचानक ढग दाटून आले. पाहता-पाहता विजांचा कडकडाट झाला. तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथे शेत शिवारात वीज कोसळल्याने झाडाला बांधलेले दोन बैल जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास हरदोली, कर्कापूर परिसरात मेघ गर्जनेसह पाऊस पडला. कर्कापूर शिवारात शेतकरी मशागतीची पूर्वतयारी करीत आहे. वासुदेव सखाराम माहुले रा. कर्कापुर सकाळी शेतावर गेले. मशागतीची कामे केली. दुपारी २ वाजता वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना सुरु झाली. पावसाला सुरुवात झाली. वासुदेव यांनी बैलाना एका शेतातील झाडाला बांधले. नेमकी शेतशिवारात वीज पडली. यात दोन्ही बैल जागीच ठार झाले. पुढे शेतीचा हंगाम आहे. आता काय करावे या चिंतेने वासुदेव यांना ग्रासले आहे. तलाठी दुबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही बैल ठार झाले. शासनाने येथे आर्थिक मदत देण्याची मागणी पंचायत समितीचे गटनेता हिरालाल नागपुरे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Electricity killed two bulls and helped them