तिरोडी-कटंगी रेल्वे ट्रॅकवर धावली विजेवरील मालगाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST2021-07-11T04:24:27+5:302021-07-11T04:24:27+5:30
तुमसर-तिरोडीच्या दरम्यान ब्रिटिशकालीन रेल्वे ट्रॅक आहे, परंतु तिरोडी ते कटंगीच्या दरम्यान रेल्वे ट्रॅक नव्हता. त्यामुळे कटंगी - बालाघाट ...

तिरोडी-कटंगी रेल्वे ट्रॅकवर धावली विजेवरील मालगाडी
तुमसर-तिरोडीच्या दरम्यान ब्रिटिशकालीन रेल्वे ट्रॅक आहे, परंतु तिरोडी ते कटंगीच्या दरम्यान रेल्वे ट्रॅक नव्हता. त्यामुळे कटंगी - बालाघाट रेल्वेमार्गाला जोडता येत नव्हते. त्यामुळे पुढील प्रवास प्रवाशांना करता येत नव्हता. अनेक वर्षांपासून तिरोडी-कटंगी रेल्वे ट्रॅक बांधकामाची मागणी होती. ती आता पूर्ण झाली. रेल्वेने या मार्गावर विद्युतीकरण केले. त्याची चाचणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी व वीज तज्ज्ञांच्या उपस्थितीत मालगाडी वाहतूक करून करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. तिरोडी ते बालाघाट ६० किमी ताशी ९० किमी गतीने मालगाडीची चाचणी घेण्यात आली. दरम्यान, वीज अभियंत्यांनी निरीक्षण केले.
तिरोडा येथे टर्मिनल स्टेशन तयार करण्यात आले आहे. रेल्वे समितीचे अध्यक्ष प्रभाकर नायडू यांनी इतवारी-तिरोडी-कटंगी - बालाघाटच्या दरम्यान प्रवासी रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी केली आहे. कटंगी बालाघाट रेल्वे ट्रॅक पूर्णत्वाकरिता बालाघाटचे खासदार ढालसिंग बिसेन यांनी विशेष प्रयत्न केले.
तुमसर टाउनला रेल्वे स्थानकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली असून, उत्तर भारताला जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.