कंन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST2021-08-26T04:38:12+5:302021-08-26T04:38:12+5:30

भंडारा : जिल्ह्यातील कंन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर असोसिएशनची निवडणूक मंगळवारी व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यात अध्यक्षपदी अनिल मल्होत्रा, सचिव पदावर ...

Election of Consumer Product Distributors Association | कंन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनची निवडणूक

कंन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनची निवडणूक

भंडारा : जिल्ह्यातील कंन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर असोसिएशनची निवडणूक मंगळवारी व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यात अध्यक्षपदी अनिल मल्होत्रा, सचिव पदावर रवी राजाभोज, तर कोषाध्यक्षपदी नीलेश रंभाड हे विजयी झाले. असोसिएशनची बैठक भंडारा येथे मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनचे ४८ व्यापारी सदस्य उपस्थित होते. सभेत अध्यक्ष सचिव व कोषाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात यावी, असे ठरविण्यात आले. मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. यात अध्यक्षपदासाठी अनिल मल्होत्रा व जयेश संघानी, सचिवपदासाठी रवी राजाभोज व राहुल निर्वाण, तर कोषाध्यक्षपदासाठी नीलेश रंभाड व चंद्रकांत कोहाड रिंगणात होते. यावेळी अध्यक्षपदी निवडून आलेल्या अनिल मल्होत्रा यांना ३३ मते मिळाली, तर जयेश संघानी यांना १५ मते मिळाली. सचिवपदासाठी रवी राजाभोज यांनी ३७ मते घेतली. राहुल निर्वाण यांना ११ मते मिळाली. कोषाध्यक्ष पदासाठी नीलेश रंभाड यांना ३७ मते मिळाली, तर चंद्रकांत कोहाड ११ यांना मिळाली. नवनिर्वाचित तिन्ही डिस्ट्रिब्युटर्सनी उपस्थित सर्वांना असोसिएशनच्या कामात सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येईल, असे आश्वासित केले. आभार संदीप गुरबानी यांनी मानले.

Web Title: Election of Consumer Product Distributors Association