भीमशक्ती महिला जिल्हा संघटना कार्यकारिणीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST2021-02-06T05:06:02+5:302021-02-06T05:06:02+5:30

भंडारा : भीमशक्ती महिला संघटना जिल्हा शाखा भंडारा कार्यकारिणीची बिनविरोध निवड जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे तसेच संघटक बाळकृष्ण शेंडे ...

Election of Bhim Shakti Mahila District Association Executive | भीमशक्ती महिला जिल्हा संघटना कार्यकारिणीची निवड

भीमशक्ती महिला जिल्हा संघटना कार्यकारिणीची निवड

भंडारा : भीमशक्ती महिला संघटना जिल्हा शाखा भंडारा कार्यकारिणीची बिनविरोध निवड जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे तसेच संघटक बाळकृष्ण शेंडे ,,भागवत दामले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. याप्रसंगी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण व दीप प्रज्ज्वलित करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

भीमशक्ती महिला संघटना जिल्हा अध्यक्ष अरुणा दामले,उपाध्यक्ष पपिता वंजारी, महासचिव रूपा लेंधरे,सचिव विभा रामटेके,संघटक माधुरी सुखदेवे ,कार्याध्यक्ष सुमन वंजारी,सदस्य संघमित्रा गेडाम, प्रमिला बोरकर,शर्मीला बोरकर, विशाखा बनसोड, मंदा मेश्राम, वणमाला बोरकर,इंदू बारसागडे, लक्ष्मी मेश्राम, सरिता टेंभूर्ण, मनिषा मेश्राम, संयोगिता खोब्रागडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

Web Title: Election of Bhim Shakti Mahila District Association Executive