वयोवृद्ध रानहल्ल्याचा बेहळे तलावात मृत्यू
By युवराज गोमास | Updated: April 4, 2023 15:43 IST2023-04-04T15:43:43+5:302023-04-04T15:43:52+5:30
वनाधिकाऱ्यांची उपस्थिती : मृत्यूचे कारण अस्पष्ट

वयोवृद्ध रानहल्ल्याचा बेहळे तलावात मृत्यू
भंडारा : मोहाडी तालुक्यातील कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या तुमसर प्रादेशिक वनविभागाच्या अधिकार क्षेत्रातील बेहळे तलावात पाण्याशेजारी मंगळवारला सकाळी एका वयोवृद्ध रानहल्ल्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
पालोरा बिटचे वनरक्षक माेहन हाके यांचेकडून घटनेची माहिती होताच प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी एस. एन. शेंडे, तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी छगन राहांगडाले, क्षेत्र सहाय्यक ए. वाय. शेख, तसेच कोका वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. करडी पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांचेकडून शवविच्छेदनाचे कार्य सुरू आहे.