दारूबंदीसाठी जांभळीत महिलांचा एल्गार
By Admin | Updated: July 10, 2014 23:27 IST2014-07-10T23:27:02+5:302014-07-10T23:27:02+5:30
तालुक्यातील जांभळी सडक येथे हातभट्टीची मोहफुलाची दारूविक्री अवैधरित्या पोलिसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत. याची माहिती पोलिसांना देवूनही काहीच कार्यवाही न झाल्यामुळे अखेर महिलांनी

दारूबंदीसाठी जांभळीत महिलांचा एल्गार
साकोली : तालुक्यातील जांभळी सडक येथे हातभट्टीची मोहफुलाची दारूविक्री अवैधरित्या पोलिसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत. याची माहिती पोलिसांना देवूनही काहीच कार्यवाही न झाल्यामुळे अखेर महिलांनी गावातून मोर्चा काढून दारूविक्रेत्यांच्या घरी जावून दारूबंदीचा नारा दिला. या पुढेही दारूबंदी झाली नाही तर थेट पोलीस स्टेशनवर मोर्चा नेण्यात येईल, असा इशाराही यावेळी महिलांनी दिला.
जांभळी सडक येथे मागील बऱ्याच दिवसापासून अवैधरित्या मोहफुलांची हातभट्ट्याची दारूविक्री पोलिसांच्या आशिर्वादाने रामभरोस सुरू होती. यामुळे गावातील लहान मुलेही दारूच्या आहारी गेले होते. यामुळे गावकरी महिला त्रस्त झाल्या होत्या. ही दारूबंदी तात्काळ बंद करण्यासाठी ग्रामपंचयततर्फे व गावकऱ्यातर्फे पोलीस प्रशासनाला सुचना देण्यात आली होती.
ग्रामपंचायततर्फे दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. आज ग्रामपंचायत, गावातील महिला, तंटामुक्त गाव समितींच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा संपूर्ण गावातून फिरत थेट अवैध दारूविक्रेत्याच्या घरी नेण्यात आला. त्यांच्या घरून वाळलेली मोहफुल पोलिसांच्या मदतीने काढण्यात आले. तसेच गावाबाहेरील हातभट्याही नष्ट करण्यात आल्या. यानंतरही पोलिसांच्या आशिर्वादाने जर गावात अवैध दारूविक्री सुरू झाली तर हाच महिलांचा मोर्चा पोलीस स्टेशन येथे नेण्यात येईल, असा इशारा दिला.
दारूबंदी आंदोलनात देवांगणा गडपायले, मंदा रामटेके, वैजयंता लांजेवार, आशा मेश्राम, अस्मिता तिरपुडे, अंजिरा कांबळे, सुरेखा मेश्राम, पुष्पा हुमणे, रसिका खोब्रागडे, सत्यभामा रामटेके, सुरेखा रामटेके, मना रामटेके, निर्मला रामटेके, शालु रामटेके, नाजुका गजभिये, संगीता रामटेके, वैशाली गणवीर, अहिल्या रामटेके, शालु रामटेके, सायत्रा तिरपुडे, सीमा गणवीर, कल्पना रामटेके, सकुंतला रामटेके, जया लांजेवार, बेबीनंदा रामटेके, छगना मेश्राम, इंदु रामटेके, सुशिला रामटेके, सीमा घोनमोडे, प्रमिला गेडाम, सुनंदा नागदेवे, अनुपा कांबळे, रेखा चोपकर, कमला घोरमारे, रत्नघोष रामटेके, उपसरपंच राकेश दामले, ग्रा.पं. सदस्य अशोक हुमणे, पोलीस पाटील होमराज गणवीर, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश रामटेके व गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)