रेती चोरी करताना आठ ट्रॅक्टर पकडले
By Admin | Updated: September 13, 2014 23:39 IST2014-09-13T23:39:22+5:302014-09-13T23:39:22+5:30
तालुक्यातील तामसवाडी घाटावरून रेती चोरी होत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळताच भरारी पथकासोबत घाटावर जाऊन ८ ट्रॅक्टराना अवैध रेतीसह पकडले. ही कार्यवाही दि. ११ सप्टेंबर रोजी

रेती चोरी करताना आठ ट्रॅक्टर पकडले
तुमसर : तालुक्यातील तामसवाडी घाटावरून रेती चोरी होत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळताच भरारी पथकासोबत घाटावर जाऊन ८ ट्रॅक्टराना अवैध रेतीसह पकडले. ही कार्यवाही दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली. त्यांना तहसील कार्यालयात जमा करून दंड वसूल करण्यात आला.
काही दिवसापासून तामसवाडी घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करीत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. २० ते ३० ट्रॅक्टर चोरी करत असल्याची कुणकुण लागताच काल तहसीलदार सचिन यादव, नायब तहसीलदार हिंगे, नायब तहसीलदार सुर्यवंशी, मंडळ अधिकारी ७ च्या सुमारास तामसवाडी घाटावर पोहचले. यावेळी अवैघ रेती भरणे सुरू होती. गुरूवारी ७ ट्रॅक्टर आणि दि. १२ रोजी सकाळी १ ट्रॅक्टर अशी ८ ट्रॅक्टर पकडून त्यांना तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे. यासर्व ट्रॅक्टरवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार यादव यांनी दिले. दररोज चोरीची रेती उत्खन्न करून महसूल विभागाचा लाखो रूपयांचा महसूल बूडत आहे. यासाठी प्रत्येकी ३२०० प्रती ट्रॅक्टर प्रमाणे २५,७०० रूपयांचा दंड महसूल विभागात जमा केला जाईल, अशी माहिती तहसीलदार यादव यांनी दिली. सदर कार्यवाहीनंतर चोरीवर आळा घालण्याचे प्रयत्न सुरू राहतील याकरिता पोलिस प्रशासनाला पोलीस चौकी लावण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)