प्राणघातक हल्ला प्रकरणात आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST2021-01-01T04:24:27+5:302021-01-01T04:24:27+5:30

लाखांदूर : रेती तस्कराच्या खबऱ्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणात अर्जुनी माेरगाव पाेलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यातील दाेन प्रमुख ...

Eight arrested in assault case | प्राणघातक हल्ला प्रकरणात आठ जणांना अटक

प्राणघातक हल्ला प्रकरणात आठ जणांना अटक

लाखांदूर : रेती तस्कराच्या खबऱ्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणात अर्जुनी माेरगाव पाेलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यातील दाेन प्रमुख आराेपी लाखांदूर येथील आहे. तर इतर सहा आराेपी नागपूरचे असल्याचे सांगण्यात आले.

आशिष पांडुरंग परशुरामकर (२६) रा. पिंपळगाव काे. ता. लाखांदूर असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणात वीरेंद्र हटवार (२६), विक्रम हटवार (२४) दाेघे रा. लाखांदूर, मनीष इंदूरकर, सिध्दार्थ हरडे, दानिश शेख, निखील शेंडे, सुमित वैरागडे, चेतन काेरे सर्व रा. नागपूर अशी आराेपींची नावे आहेत. साेमवारी रात्री कन्हाळगा बुधेवाडा मार्गावर आशिषवर प्राणघातक हल्ला करण्यात आला हाेता. या प्रकरणात जखमीचे बयाण आणि वैद्यकीय अहवालावरुन लाखांदूर पाेलिसांनी गुन्ह्याची नाेंद घेतली मात्र प्रकरण अर्जुनी माेरगाव ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले. अर्जुनी माेरगाव पाेलिसांनी याप्रकरणाचा तपास करुन आठ जणांना ताब्यात घेतले. रेती तस्करीच्या समंतर व्यवसायांतर्गत तक्रारी करण्यावरुन हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: Eight arrested in assault case