शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक हा समाजनिर्मितीचा कणा

By admin | Updated: October 10, 2016 00:30 IST

जेव्हा शिक्षक जागृत होईल, तेव्हाच विद्यार्थी घडेल. शिक्षकांकडून समाजाला चूक अभिप्रेत नाही.

शंकर राठोड यांचे प्रतिपादन : टेकेपार येथे केंद्रस्तरीय शिक्षक परिषदभंडारा : जेव्हा शिक्षक जागृत होईल, तेव्हाच विद्यार्थी घडेल. शिक्षकांकडून समाजाला चूक अभिप्रेत नाही. शिक्षक हा समाजनिर्मितीचा कणा आहे. शिक्षकांनी जर मनावर घेतले तर लाखो जिल्हाधिकारी तयार करू शकतात. त्यांनी आपल्या कामावर, पदावर गर्वाने काम केले पाहिजे, असा मौलिक सल्ला भंडारा पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी दिला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आराखडा कार्यक्रमांतर्गत धारगाव केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद विनोद विद्यालय टेकेपार (डोड.) येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना शंकर राठोड यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्यामकर्ण तिडके, राजर्षी शिंदे, एच.पी. लांजेवार, सुधीर उके यांची प्रमुख उपस्थिती होती. शंकर राठोड पुढे म्हणाले, शिक्षकांना विद्यार्थी घडविण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. आदर्श समाज घडविण्यासाठी शिक्षकांची सतत प्रयत्न करावे. शिक्षकांनी सकारात्म दृष्टीकोन ठेवून पालकांशी सतत संपर्क ठेवले तर गावाचे त्यांना सहकार्य मिळेल, असेही ते म्हणाले. अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी शिक्षक हा विद्यार्थी कसा घडवू शकतो. लहानशी चूक शिक्षकाला कशी भोवते, हे समजावून सांगितले. श्यामकर्ण तिडके म्हणाले, वर्गातील शेवटच्या बाकावर असलेला विद्यार्थी सुद्धा मागे राहू नये, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक हा भावी पिढी घडविणारा आहे. यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे. केंद्रप्रमुख राजर्षी शिंदे यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आराखड्याची भूमिका समजावून सांगितले व शिक्षकांची याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे सांगितले. यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आराखड्याचे वाचन करण्यात आले. केंद्रातील काही शिक्षकांनी आपण वर्गात कसे शिकवितो, हे प्रत्यक्ष कृतीतून सांगितले.संचालन आचल दमाहे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक लांजेवार यांनी केले. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)