शिक्षण हे वाघिणीचे दूध -रामचंद्र अवसरे
By Admin | Updated: October 11, 2016 00:36 IST2016-10-11T00:36:04+5:302016-10-11T00:36:04+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेत असताना त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले.

शिक्षण हे वाघिणीचे दूध -रामचंद्र अवसरे
भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेत असताना त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठवेून आपला सर्वांगीण विकास करावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देवून जीवनात यशाचे शिखर गाठावे, शिक्षण हे वाघिणीचे दुध असल्याचे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी व्यक्त केले.
सालेबर्डी येथील स्व. कबलजीत स्मृती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य प्रेमदास वनवे, सरपंच जिजा मेश्राम, प्रेमिला शहारे, उपसरपंच विजय चवळे, हिरालाल पुडके, शालु चवळे, रणभिर कांबळे, सारंग घारगडे, करुणा गजभिये, अस्मिता पंचबुध्दे, सुनिता गंथाडे, कांता अतकरी, कुसन टिचकुले, भैया घारगडे, प्रकाश मेश्राम आदी उपस्थित होते.
यावेळी वनवे यांनी, विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासक्रमातील ज्ञानावर अवलंबून न राहता सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहणे आवश्यक आहे. वाचनामुळे मानसाचा बुध्दीमत्तेचा विकास होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले. वाचनालयाच्या वतीने गावातील दहावी व बारावीमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह, पुस्तक, नोटबूक व पेन पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. संचालन मुख्याध्यापक बी. जी. किरणापुरे व अर्जुन शहारे यांनी केले. प्रास्ताविक मनोहर मेश्राम यांनी केले तर आभार जितेंद्र गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाला नाना सरादे, निलेश राखडे, शुभम चवळे, डुडेश्वर कांबळे, गणेश नागलवाडे, निखिल पुडके यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)