शिक्षण संशोधनात्मक असावे

By Admin | Updated: January 25, 2016 00:45 IST2016-01-25T00:45:25+5:302016-01-25T00:45:25+5:30

मुलांचे शिक्षण केवळ रोजगार प्रधान न करता संशोधनात्मक असावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Education should be amenable | शिक्षण संशोधनात्मक असावे

शिक्षण संशोधनात्मक असावे

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : सनीज स्प्रिंग डेलचा वार्षिकोत्सव
भंडारा : मुलांचे शिक्षण केवळ रोजगार प्रधान न करता संशोधनात्मक असावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सनीज स्प्रिंग डेल हायस्कुल येथे शनिवार रोजी आयोजित वार्षिकोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, आ.रामचंद्र अवसरे, एन.एन.एस. बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे उपस्थित होते.
तत्पूर्वी शाळेच्या वतीने संचालक सुनिल मेंढे यांनी ना. गडकरी यांचे स्वागत केले. गडकरी म्हणाले, धानासाठी प्रसिद्ध भंडारा जिल्ह्यात धानाच्या तणसीपासून इथेनॉलची निर्मिती होऊ शकते. नजिकच्या काळात जिल्ह्यातील गाड्या इथेनॉलवर चालू शकतील. त्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसीत होत आहे. शिक्षण हे केवळ नोकरीप्रधान नसावे, तर त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असावा, स्प्रिंग डेल हायस्कुलची नेत्रदिपक प्रगती पाहून समाधान व्यक्त करीत गडकरी यांनी सुनिल मेंढे यांचे कौतूक केले. यावेळी अनिल मेंढे आणि कुटुंबातील सदस्य प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Education should be amenable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.