शिक्षणासह प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन आवश्यक
By Admin | Updated: November 24, 2014 22:52 IST2014-11-24T22:52:55+5:302014-11-24T22:52:55+5:30
शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकामधून गेला पाहिजे. तरच त्याला शिक्षकाच्या समस्या काय असतात हे समजेल. मात्र सध्याच्या काळात अनेक आश्वासने देऊन निवडणूक लढविले जाते.

शिक्षणासह प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन आवश्यक
साकोली : शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकामधून गेला पाहिजे. तरच त्याला शिक्षकाच्या समस्या काय असतात हे समजेल. मात्र सध्याच्या काळात अनेक आश्वासने देऊन निवडणूक लढविले जाते. मात्र निवडून आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाकडेच प्रतिनिधी पाहतही नाही. ही शिक्षकांसाठी खेदाची बाब आहे. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. या नियमाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी श्क्षिक आमदार तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह व्ही.यु. डायगव्हाणे यांनी केले.
मार्तंडराव कापगते विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय जांभळी सडक येथे आयोजित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे आयोजित भंडारा जिल्हा अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य होमराज कापगते, सचिव अशोक पारधी, मार्तंडराव गायधने आदी उपस्थित होते.
अधिवेशनाचे उद्घाटन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपुरचे जिल्हा कार्यवाह आनंदराव कारेमोरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डायगव्हाणे म्हणाले, शिक्षकाच्या समस्या सोडविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ प्रयत्नशील आहे. शिक्षण विभागातील अधिकारी मात्र अनेक नियम लाऊन शिक्षकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिक्षकांचे लक्ष शिकविण्यात लागत नाही. शासनाने त्रासदायक नियमांना आळा घालण्याची मागणी केली.
कार्यक्रमाला राजेश धुर्वे, टेकचंद मारबते, श्रीधर खेडीकर, अरविंद काशीवार, शम गावड, जिभकाटे, चंद्रशेखर बावणे, डी.बी. मेश्राम, मिना दलाल, कांता कामथे, श्रीमती गोस्वामी, संजय वाटकर, संजय गोतमारे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी ए.एन. रामटेके, एस.एम. बोरकर, आर.ए. लंजे, डी.एम. ठवरे, एस.एस. बन्सोड, पी.आर. उमाठे, आर.जी. कामथे, आर.जी. कापगते, आर.एस. समरीत, ए.डब्लू. ईलमकर, बी.डी. गिऱ्हेपुंजे, बी.जे. किरणापुरे, बी.एम. टेंभुर्णे, जी.एम. झोडे, आर.व्ही. धोखे, एस.एम. तवाडे, के.व्ही. परशुरामकर, महिला प्रतिनिधी यु.आर. पाखमोडे, एस.यु. कावळे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन रुपेश कापगते व अर्चना बावणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)