रस्त्याला लागले ग्रहण
By Admin | Updated: October 7, 2014 23:30 IST2014-10-07T23:30:48+5:302014-10-07T23:30:48+5:30
गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येत असलेल्या गणेशपूर-पिंडकेपार-कोरंभी देवी या सात कि़मी. अंतर असलेल्या रस्त्याचे जुलै महिन्यात खडीकरण करण्यात आले. परंतु कोरंभी देवी येथे दरवर्षी नवरात्रीत

रस्त्याला लागले ग्रहण
भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येत असलेल्या गणेशपूर-पिंडकेपार-कोरंभी देवी या सात कि़मी. अंतर असलेल्या रस्त्याचे जुलै महिन्यात खडीकरण करण्यात आले. परंतु कोरंभी देवी येथे दरवर्षी नवरात्रीत भाविका भक्ताचे लोंढे येत असतात. त्यामुळे पहिल्याच यात्रेने या रस्त्याची वाट लावून दिली. संपूर्ण रस्ता उखडल्याने जागो जागी खड्डे निर्माण झाले आहे. गिट्टी इतरत्र पसरली आहे, मातीमिश्रीत मुरूमांमुळे या रस्त्याने एखादा वाहन गेल्यास धुळ इतरत्र उडत असून पादचारी, मजूर, वाहनचालकांना कामलीचा त्रास होत आहे.
नवरात्रीच्या दिवसात भाविक भक्त कोरंभी येथील पिंगलाई मातेचे दर्शन घेण्यासाठी वाहनांची वर्दळ यावर्षी अधिक असल्याने संपूर्ण रस्ता धुळीने माखला आहे.
रहदारी करताना ही धूळ वाहन चालकांच्या डोळ्यात गेल्याने दोन भाविकांचा गाडीवरील ताबा सुटला. रस्त्याच्या पिचिंगखाली पडून जखमी झाले. उपचारासाठी आर्थिक खर्च सहन करावा लागला.
मात्र संबंधित विभागाला अनातरी जाग येईल काय, तीन महिन्यातच या रस्त्याची वाट लागली आहे. खडीकरण नावापुरते अशी ओरड सुज्ञ नागरिक बोलून दाखवित आहेत.
कोरंभी, पिंडकेपार, सालेबर्डी, खैरी, कवडशी, साहुली येथील विद्यार्थी, मजूर, दुध उत्पादक मोठ्या संख्येने याच रस्त्याचे जाणे येणे करीत असतात.
भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण तसेच तहसीलीचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून नागरिक कोरंभी-गणेशपूर याच रस्त्याने जाणे येणे करावे लागते. वर्षापासून या रस्त्याला डांबरीकरणाची प्रतिक्षा आहे.
त्यासाठी संबंधित विभागाने त्वरित रस्त्याची दुरूस्ती करून डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
(नगर प्रतिनिधी)