समाज प्रगतिपथावर नेणे सर्वांचेच कर्तव्य

By Admin | Updated: May 2, 2016 00:37 IST2016-05-02T00:37:03+5:302016-05-02T00:37:03+5:30

व्यक्ती लहान असो की मोठा, तो समाजातच वावरत असतो. समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. समाज घडविणे, ..

The duty of everyone to take the community progress | समाज प्रगतिपथावर नेणे सर्वांचेच कर्तव्य

समाज प्रगतिपथावर नेणे सर्वांचेच कर्तव्य

नाना पटोले यांचे प्रतिपादन : कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १० जोडपी विवाहबद्ध
तुमसर : व्यक्ती लहान असो की मोठा, तो समाजातच वावरत असतो. समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. समाज घडविणे, त्यात परिवर्तन करणे व प्रगतिपथावर नेणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. कुणबी समाज काबाडकष्ट करणारा समाज आहे. या समाजातील प्रत्येक वधूपालकाने सामूहिक विवाह सोहळ्यातच लग्न करावे, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.
येथील कुणबी समाज भवनात कुणबी समाज बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यात १० जोडपी विवाहबद्ध झालीत. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार शिशुपाल पटले, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, आमदार चरण वाघमारे, माजी आमदार मधुकर कुकडे, अनिल बावनकर, मनोहर सिंगनजुडे, मधुकर सांबारे, नरेश डहारे, भाऊराव तुमसरे, नारायणराव तितीरमारे, प्रमोद तितीरमारे उपस्थित होते. खासदार पटोले, माजी आमदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते नवदांपत्यांना भेटवस्तू वितरीत करण्यात आल्या. सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कुणबी समाज संघटनेतर्फे करण्यात आले. सामूहिक विवाह सोहळ्याला कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत सेलोकर, सचिव किशोर चौधरी, उपाध्यक्ष हरिभाऊ सिंगाडे, संघटनेचे पदाधिकारी राजकुमार माटे, अनिल धरजारे, राजेंद्र कडव, रामप्रसाद कहालकर, राधेश्याम हिंगे, जगन वहिले, सेवक कुथे, प्रा.संजय बुराडे, किशोर बोंदरे, अशोक कुकडेसह नगरसेवक आशिष कुकडे, नामदेव कुथे, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, अ‍ॅड.दिलीप तिमांडे, रामरतन खोकले, निशीकांत इलमे, धनराज माहुले, नगरसेविका मीना गाढवे, शिला धार्मिक, लक्ष्मी कहालकर, सीमा भुरे, फुकट हिंगे, देवसिंग सव्वालाखे, नामदेव भुते, टाटा लांजेवार, प्रा.पंकज भुते, सुधाकर धोटे, आगाशे, काका भोयर, बालकदास ठवकर, शशीकांत तुमसरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. संचालन व आभार पंचायत समितीचे माजी सदस्य सुधाकर कहालकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The duty of everyone to take the community progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.